पाटणा, लखनौपेक्षाही जास्त खून नागपुरात; देशात सर्वाधिक प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 07:38 AM2021-09-17T07:38:00+5:302021-09-17T07:40:02+5:30

Nagpur News देशात लोकसंख्येच्या तुलनेत खुनाचा सर्वाधिक ३.९ इतका दर नागपुरातच नोंदविण्यात आला. शहरात वर्षभरात ९७ हत्त्या झाल्या व २०१८, २०१९ च्या तुलनेत ही संख्या वाढलेली दिसून आली.

More murders in Nagpur than in Patna, Lucknow; The highest proportion in the country | पाटणा, लखनौपेक्षाही जास्त खून नागपुरात; देशात सर्वाधिक प्रमाण

पाटणा, लखनौपेक्षाही जास्त खून नागपुरात; देशात सर्वाधिक प्रमाण

googlenewsNext
ठळक मुद्देआर्थिक व कौटुंबिक वादातून २५ टक्के हत्त्या

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एरवी बिहारची राजधानी पाटणा व उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ या शहरांमध्ये अधिक गुन्हेगारी असल्याचे आकडेवारी सांगते. परंतु राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरने हत्त्यांच्या बाबतीत या शहरांनादेखील मागे टाकले आहे. २०२० साली कोरोनाचे निर्बंध असूनदेखील या दोन्ही शहरांपेक्षा जास्त खुनांची नोंद नागपुरात झाली. दुर्दैवाची बाब म्हणजे देशात लोकसंख्येच्या तुलनेत खुनाचा सर्वाधिक ३.९ इतका दर नागपुरातच नोंदविण्यात आला. शहरात वर्षभरात ९७ हत्त्या झाल्या व २०१८, २०१९ च्या तुलनेत ही संख्या वाढलेली दिसून आली. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. (More murders in Nagpur than in Patna, Lucknow; The highest proportion in the country)

२०१८ साली नागपुरात ७२ तर २०१९ साली ९० खुनाच्या घटनांची नोंद झाली होती. २०२० मध्ये काही महिने लॉकडाऊन असल्यामुळे पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त होता. मात्र तरीदेखील खून वाढले. २०१८ च्या तुलनेत २०२० मध्ये अशा घटनांमध्ये सुमारे ३५ टक्के वाढ झाली. पाटणा व लखनौ या शहरांत हाच आकडा अनुक्रमे ७९ व ८१ इतका होता.

सर्वाधिक टक्केवारी नागपुरातच

२०२० मध्ये बहुतांश मोठ्या शहरांमधील हत्येच्या घटनांमध्ये २०१८ व २०१९ च्या तुलनेत घट नोंदविण्यात आली. केवळ दिल्ली (१०.८१ टक्के), इंदूर (१०.५२ टक्के), सुरत (७.४० टक्के) या शहरांत २०१८ च्या तुलनेत हत्त्या वाढल्या. नागपुरात मात्र हीच टक्केवारी जवळपास ३५ टक्के इतकी असून २०१८ च्या तुलनेत सर्वाधिक टक्केवारी उपराजधानीतच वाढली.

प्रेमप्रकरणातून ११ टक्के हत्या

२०२० मध्ये प्रेमप्रकरणांतून ११.३४ टक्के हत्त्या नोंदविण्यात आल्या, तर कौटुंबिक व आर्थिक वादातून २५.७७ टक्के हत्त्या झाल्या. सूड घेण्याच्या उद्देशाने २३.७१ टक्के हत्त्या करण्यात आल्या. ९७ घटनांमध्ये १०१ जणांची बळी गेला. एकूण मृतांमध्ये ९ महिलांचा समावेश होता. याशिवाय चार अल्पवयीन व चार ज्येष्ठ नागरिकांनादेखील जीवे मारण्यात आले.

------

Web Title: More murders in Nagpur than in Patna, Lucknow; The highest proportion in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.