रुग्णालयात नव्हे, कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:07 AM2021-09-13T04:07:54+5:302021-09-13T04:07:54+5:30

नागपूर : कोरोना पॉझिटिव्ह येणा-या प्रत्येक रुग्णाला एकतर कोविड हॉस्पिटलमध्ये किंवा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. यात ...

More patients at Covid Care Center, not at the hospital | रुग्णालयात नव्हे, कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण अधिक

रुग्णालयात नव्हे, कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण अधिक

Next

नागपूर : कोरोना पॉझिटिव्ह येणा-या प्रत्येक रुग्णाला एकतर कोविड हॉस्पिटलमध्ये किंवा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. यात सौम्य लक्षणांची संख्या असणा-यांची संख्या मोठी असल्याने आमदार निवासात तब्बल २५ रुग्ण भरती आहेत. विविध शासकीयसह खासगी रुग्णालयाच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. रविवारी ६ नवे रुग्ण आढळून आले.

‘डेल्टा प्लस व्हेरियंट’चा धोका ओळखून महानगरपालिकेने ‘होम आयसोलेशन’ची संकल्पनाच रद्द केली. मध्यम किंवा गंभीर लक्षणे असतील तर कोविड हॉस्पिटल किंवा सौम्य लक्षणे असतील तर कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णाला दाखल करून घेण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. यामुळे सध्या मेडिकलमध्ये ११, एम्समध्ये १९ तर मेयोमध्ये एकही रुग्ण नाही. रविवारी १२ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होताच या सर्वांची रवानगी आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आली. यामुळे येथील रुग्णांची संख्या आता २५ झाली आहे.

-शहरात कोरोनाचे ६ रुग्ण

शहरात रविवारी ६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर ग्रामीणमध्ये ७ दिवसानंतर पहिल्यांदाच शून्य रुग्णाची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ४,९३,१२० झाली. सलग १३ दिवसांपासून मृत्यूची संख्या १०,११९वर स्थिर आहे. आज ६ रुग्ण बरे झाले. बरे होण्याचा दर ९७.९४ टक्क्यांवर गेला आहे.

-आठवड्याभरात रुग्णांत दुप्पटीने वाढ

नागपूर जिल्ह्यात २९ आॅगस्ट ते ४ सप्टेंबर या आठवड्याभरात ३५ रुग्ण व १ मृत्यूची नोंद झाली होती. तर ५ ते ११ सप्टेंबर या आठवड्यात रुग्णसंख्येत दुप्पटीने वाढ होऊन ६४ वर पोहचली आहे. मृत्यूची नोंद नसलीतरी झालेली वाढ चिंता वाढविणारी आहे. मागील आठवड्यात सलग तीन दिवस दुहेरी आकडा दिसून आला.

:: कोरोनाची रविवारची स्थिती

दैनिक चाचण्या: ४३५९

शहर : ६ रुग्ण व ० मृत्यू

ग्रामीण : ० रुग्ण व ० मृत्यू

ए. बाधित रुग्ण :४,९३,१२०

ए. सक्रिय रुग्ण :६३

ए. बरे झालेले रुग्ण : ४,८२,९३८

ए. मृत्यू : १०११९

Web Title: More patients at Covid Care Center, not at the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.