बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:08 AM2021-04-21T04:08:48+5:302021-04-21T04:08:48+5:30
सावनेर/ काटोल/ नरखेड/ कळमेश्वर/ कामठी/ उमरेड /कुही/ रामटेक/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे. ...
सावनेर/ काटोल/ नरखेड/ कळमेश्वर/ कामठी/ उमरेड /कुही/ रामटेक/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे. मंगळवारी जिल्ह्यात ३४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर २००५ रुग्णांची नव्याने भर पडली. मंगळवारी जिल्ह्यात ग्रामीण भागात २०४८ नागरिकांनी कोरोनावर मात केली. ग्रामीण भागात आतापर्यंत ८५,४९६ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ५६,४२६ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. १३ तालुक्यांत आतापर्यंत १५११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २८,०३५ इतकी आहे.
नरखेड तालुक्यात ९४ रुग्णांची भर पडली. यात शहरातील १६, तर ग्रामीण भागातील ७८ रुग्णांचा समावेश आहे. सध्या ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १६४९, तर शहरातील २८३ इतकी झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत येणाऱ्या गावात (६), जलालखेडा प्राथमिक आरोग्य कोंद्र (३०), मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्र (२८), तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावात १४ रुग्णांची नोंद झाली.
काटोल तालुक्यात ८५९ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील ५८, तर ग्रामीण भागातील ३२ रुग्णांचा समावेश आहे.
रामटेक तालुक्यात १६१ रुणांची भर पडली. यात रामटेक शहरातील ३०, तर ग्रामीण भागातील १३१ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत ४५६८ नागरिक बाधित झाले आहेत. यातील २२७० रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ६२ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या तालुक्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २२९८ इतकी आहे.
कळमेश्वर तालुक्यात २०१ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रात २६, तर ग्रामीण भागात १७५ रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात मोहपा येथे २२, तेलकामठी (१९), वरोडा (१३) तर धापेवाडा येथे १३ रुग्णांची नोंद झाली.
कुही तालुक्यात ६४७ नागरिकांची चाचणी करण्यात आली. यात ८१ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. उमरेड तालुक्यात ९४ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ४९, तर ग्रामीण भागातील ४५ रुग्णांचा समावेश आहे. कामठी तालुक्यात ८७६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १४१ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
हिंगण्यात स्थिती बिघडली
हिंगणा तालुक्यात १२९८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात १७५ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. वानाडोंगरी येथे सर्वाधिक ४१ रुग्णांची नोंद झाली. सध्या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९३२४ इतकी झाली आहे. यातील ५८६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर १८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.