एचआयव्हीपेक्षा ‘हेपॅटायटीस बी’चा धोका अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:42 PM2018-05-18T23:42:16+5:302018-05-18T23:42:30+5:30
भारतात काविळच्या (हेपॅटायटीस) संसर्गामुळे प्रतिवर्षी तीन लाख लोकांचा बळी जातो. सद्यस्थितीत ‘हेपॅटायटीस-बी’ ने सुमारे ४० दशलक्ष भारतीय ग्रस्त आहेत. साधारण १२ मधून १ व्यक्ती या रोगाने बाधित आहे. या आजाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास यकृतचा (लिव्हर) कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. विशेष म्हणजे ‘हेपॅटायटीस बी’चे विषाणू एचआयव्हीच्या १०० पटीने अधिक प्रमाणात संक्रमित होतात. यामुळे ‘एचआयव्ही’पेक्षा ‘हेपॅटायटीस बी’चा धोका अधिक असतो. परंतु आजही या रोगाच्या प्रतिबंधक लसीकरणाकडे परिचारिकांपासून ते सफाई कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात काविळच्या (हेपॅटायटीस) संसर्गामुळे प्रतिवर्षी तीन लाख लोकांचा बळी जातो. सद्यस्थितीत ‘हेपॅटायटीस-बी’ ने सुमारे ४० दशलक्ष भारतीय ग्रस्त आहेत. साधारण १२ मधून १ व्यक्ती या रोगाने बाधित आहे. या आजाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास यकृतचा (लिव्हर) कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. विशेष म्हणजे ‘हेपॅटायटीस बी’चे विषाणू एचआयव्हीच्या १०० पटीने अधिक प्रमाणात संक्रमित होतात. यामुळे ‘एचआयव्ही’पेक्षा ‘हेपॅटायटीस बी’चा धोका अधिक असतो. परंतु आजही या रोगाच्या प्रतिबंधक लसीकरणाकडे परिचारिकांपासून ते सफाई कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
‘हेपॅटायटीस’ म्हणजेच काविळ. याचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत. त्यामध्ये ‘हेपॅटायटीस ए’, ‘बी’, ‘सी’,‘डी’ व ‘ई’ यांचा समावेश आहे. यातील ‘हिपॅटायटीस बी’ आणि ‘सी’ हे विषाणू मानवी यकृतावर गंभीर परिणाम करतात. अगदी यकृतावरच ते हल्ला करत असल्याने या साथीपासून बळी जाणाºयांची संख्या मोठी आहे. या दोन्ही विषाणूंचा संपर्क हा रक्ताशी अधिक येतो. अशा रु ग्णांत तातडीने रक्त बदलणे हाच पर्याय ठरतो. ‘हेपॅटायटीस बी’ हा आईकडून मुलाकडे, बाळाकडे संक्रमित होण्याचा धोका असतो. ‘हिपॅटायटीस ए’ आणि ‘ई’ हे विषाणू तोंडावाटे शरीरात पोहोचतात. याला वैद्यकीय भाषेत ‘फेस्को ओरल ट्रॉन्समिशन’ म्हणून ओळखले जाते. या रु ग्णांना दूषित अन्नपदार्थ, पाण्यातून संसर्ग झालेला असतो.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अमोल समर्थ यांनी सांगितले, ‘हेपॅटायटीस बी’ हा हळूहळू वाढत जाणारा आजार असून त्याचा यकृतावर परिणाम होतो. या आजाराच्या रुग्णाला ४५ ते १६५ दिवस ताप, उलटी आणि कमी भूक लागणे यासारखी लक्षणे दिसून येतात. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण सर्वात जास्त दिसून येते. हा एक ‘डीएनए व्हायरस’चा संक्रमणाचा आजार आहे. जो एक-दुसऱ्याच्या शारीरिक संपर्कातून आणि रक्तातून पसरतो. ‘हेपॅटायटीस बी’ हे आजारातील मृत्यूचे तिसरे मुख्य कारण ठरत आहे.
मद्यपींसाठी धोकादायक
‘हेपॅटायटीस बी’वर उपचार घेतल्यानंतर स्टेरॉईड घेणारे किंवा दारूचे सेवन केल्यास हा आजारा पुन्हा उफाळून येतो. १२ मधून एका व्यक्तीला हा आजार दिसून येत असलातरी ‘पॉझिटीव्ह’ व्यक्तीचे यकृत निकामी होतेच असे नाही. साधारण १०० रुग्णांमधून सात ते आट टक्के लोकांचे यकृत निकामी होण्याची शक्यता असते.
लसीकरण आवश्यक
‘हेपॅटायटीस बी’चे विषाणू एचआयव्हीच्या १०० पटीने अधिक प्रमाणात संक्रमित होतात. यामुळे हा आजार एचआयव्हीपेक्षा भयंकर मानला जातो. असे असतानाही याच्या प्रतिबंधात्मक लसीकरणाला गंभीरतेने घेतले जात नाही. यामुळे राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत ‘हेपॅटायटीस बी’चा समावेश होणे आवश्यक आहे, असे झाल्यास या रोगामुळे होणारा ‘लिव्हर कॅन्सर’, ‘लिव्हर सिरोसीस’चे प्रमाण कमी होईल.
-डॉ. अमोल समर्थ
प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजिस्ट