Nagpur Rain: अवघ्या ४ तासात १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस; नागपूर जलमय, देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 09:21 AM2023-09-23T09:21:23+5:302023-09-23T11:48:31+5:30

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्वाचे निर्देश दिले आहेत. 

More than 100 mm of rain in just 4 hours in Nagpur, directed by Devendra Fadnavis | Nagpur Rain: अवघ्या ४ तासात १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस; नागपूर जलमय, देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश

Nagpur Rain: अवघ्या ४ तासात १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस; नागपूर जलमय, देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश

googlenewsNext

नागपूर - शुक्रवार मध्यरात्रीपासूनच पावसाला जोरदार सुरुवात झाली. विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने शहरात हाहाकार उडाला. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले. रस्ते, वस्त्या जलमय झाल्या. काही ठिकाणी विजांमुळे सेट टॉप बॉक्स टीव्हीच्या आयसी उडाल्या.

शहरातील महावितरणचे शंकर नगर आणि इतरही अनेक सब स्टेशन आणि वीज यंत्रणा पाण्यात गेली आहे. तर अनेक वस्तीमध्ये पाणी शिरल्याने महावितरणला रात्री २ पासूनच शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा बंद करावा लागला. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी रिमझिम अद्याप सुरूच आहे. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्वाचे निर्देश दिले आहेत. 

देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले की, नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या ४ तासात १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मला दिली. नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या २ चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. वृद्ध नागरिकांना सर्व ती मदत तातडीने द्या, असे निर्देश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

दरम्यान, नागपूरचा मध्यवर्ती भाग असलेले सीताबर्डी पंचशील चौक धंतोली या ठिकाणी तीन ते चार फूट पाणी रस्त्यांवर आले असून लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी भरले असून काही ठिकाणी भिंत खसल्याची माहिती देखील समोर आली आहे अनेक शाळांमध्ये देखील पाणी भरले असून जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पंचशील चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर इस्पितळे असून काही इस्पितळांच्या आत देखील पाणी शिरले आहे. त्यामुळे रुग्णांना देखील अडथळ्यांचा सामना करावा लागतो आहे.

Web Title: More than 100 mm of rain in just 4 hours in Nagpur, directed by Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.