६०० हुन अधिक मंडळांनी मागितली गणेशोत्सवाची परवानगी; विसर्जन व यंत्रणेवर मनपाचा १ कोटींचा खर्च
By गणेश हुड | Published: September 1, 2022 05:07 PM2022-09-01T17:07:17+5:302022-09-01T17:07:29+5:30
शहरातील तलावांचे प्रदूषण थांबविण्यासाएी मनपा प्रशासनाने तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी घातली आहे.
नागपूर : कोरोना संकटानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव होत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. सार्वजनिक मंडळांचे उत्साहात आहेत. शहरातील ६०३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी परवागीसाठी अर्ज केले आहे. मागील वर्षात ५५० मंडळांनी परवनगीसाठी अर्ज केले होते.
घरगुती मूर्तींची संखया दोन लाखाहून अधिक आहे. याचा विचार करता मनपा प्रशासनाने निर्माल्य संकलन, अनंत चतुर्थीला होणारे विसर्जन यासाठी तयारी सुरू केली आहे. गेल्या वर्षी १,२७,७७६ मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले होते. यावर्षी हा आकडा दोन लाखांच्या पुढे असल्याची माहिती मनपातील अधिकाऱ्यांनी दिली.
पीओपी मूर्तीवर बंदी
गेल्या वर्षी बंदी नंतरही ६,७८५ पीओपी मूर्ती होत्या. उच्च न्यायालयाने आदेश दिले आहे. मनपा प्रशासनाने त्यानुसार आदेश जारी करून पीओर्पी विक्रे त्यांवर कारवाई करणयसाठी धडक मोहीम राबविण्यात आली. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई होण्याची शकयता गृहीत धरुन विक्रेत्यांनी आधीच पीओपी मूर्ती गायब केल्या.
कृत्रिम टँक व यंत्रणेवर एक कोटीचा खर्च
गणेशोत्सवात राबविण्यात येणारी यंत्रणा, कृत्रिम टँक यावर महापालिकेला एक कोटीहून अधिक निधी खर्च करावा लागणार आहे. ३७० कृत्रिम टँकचे नियोजन करण्यात आले आहे. एका टँकवर २० हजार रुपये खर्च येतो. शहरातील तलावांचे प्रदूषण थांबविण्यासाएी मनपा प्रशासनाने तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी घातली आहे. चार फुटाहून कमी उंचीच्या मूर्तींचे विसर्जन या टँकमध्ये केले जाणार आहे. तर चार फुटाहून अधिक उंचीच्या मूर्ती शहराबाहेर विसर्जिंत करण्यात येणार आहे.