जिल्हास्तरीय मेळाव्यात दहा हजाराहून अधिक महिलांचा सहभाग

By गणेश हुड | Published: February 12, 2024 03:29 PM2024-02-12T15:29:57+5:302024-02-12T15:30:51+5:30

जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागातर्फे आयोजन 

More than ten thousand women participated in the district level gathering | जिल्हास्तरीय मेळाव्यात दहा हजाराहून अधिक महिलांचा सहभाग

जिल्हास्तरीय मेळाव्यात दहा हजाराहून अधिक महिलांचा सहभाग

नागपूर : जिल्हा परिषद नागपूरमहिला व बालकल्याण विभागाच्यावतीने ग्रामीण भागातील महिलांकरिता गोटाळपांजरी येथे जिल्हास्तरीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात दहा हजारांहून अधिक महिलांनी सहभाग घेतला. 

महिला व बालकल्याण सभापती प्रा.अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे यांच्या संकल्पनेतून  आयोजित या महिला मेळाव्यात जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने महिलांसाठी विविध योजना आणि कार्यक्रमांची माहिती देणारी प्रदर्शनी लावण्यात आली होती. तसेच  महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंचे व रूचकर पदार्थांचे स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आले होते. जिल्हास्तरीय महिला मेळावा २०२४ हा महिलांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. महिलांनी या मेळाव्यातून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात पुढे जाण्याचा संकल्प केला.

प्रसंगी जि.प.अध्यक्ष मुक्ताताई कोक्कडे, माजी मंत्री  सुनील केदार, आमदार अभिजीत वंजारी, जि.प. माजी अध्यक्ष सुरेश भोयर, अनुजाताई सूनील केदार, जि.प.उपाध्यक्ष कुंदा राऊत, म.बा.क. सभापती प्रा. अवंतिका रमेश लेकुरवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, माजी जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे, विरोधीपक्षनेते अतिश उमरे, माजी सभापती उज्वला बोढारे, माजी सभापती नेमावली माटे, सोशल मिडिया स्टार नेहा ठोंबरे, अनुराधा  भोयर, जि.प. सदस्य सलील देशमुख, वृंदा नागपूरे, सुनीता ठाकरे, मनिषा फेंडर, नीलिमा उईके, दिशा मूलताईकर, रश्मी कोटघुले, माधुरी गेडाम, पिंकी कोरती, सभापतीअरुणा शिंदे , दिशा चुनकापुरे, सुसमा कावळे गीतांजली नागभिडकर  उमरेड, माधुरी देशमुख  मिना कावळे  उपमुख्य कार्यकारी अधिकारी  दामोधर कुंभरे, गटविकास अधिकारी राजनंदिनी भागवत यांच्यासह  जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, सर्व अंगणवाडी सेविका, आणि हजारोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
 यामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महिला बाल कल्याण विभागाच्या ३९अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षिका, यांचा सत्कार करण्यात आला.महिला मेळाव्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title: More than ten thousand women participated in the district level gathering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.