मॉर्निंग वॉक आरोग्यासाठी की कोरोना घरात आणण्यासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:07 AM2021-05-23T04:07:03+5:302021-05-23T04:07:03+5:30

नागपूर : पूर्वी मॉर्निंग वॉकसाठी रस्त्यावर गर्दी करणारे नागपूरकर सध्या दक्षतेने वागताना दिसत आहेत. सकाळी फिरणाऱ्यांची गर्दी अलीकडे कमी ...

Morning walk for health or to bring Corona home? | मॉर्निंग वॉक आरोग्यासाठी की कोरोना घरात आणण्यासाठी?

मॉर्निंग वॉक आरोग्यासाठी की कोरोना घरात आणण्यासाठी?

Next

नागपूर : पूर्वी मॉर्निंग वॉकसाठी रस्त्यावर गर्दी करणारे नागपूरकर सध्या दक्षतेने वागताना दिसत आहेत. सकाळी फिरणाऱ्यांची गर्दी अलीकडे कमी दिसायला लागली असून अनेकांचा सायकलिंगवर भर दिसत आहे. हौसेखातर फिरणाऱ्यांची संख्या एकदम घटली असून नियमित फिरणारेच शहरात मॉर्निंग वॉकला जाताना दिसत आहेत.

नागपुरातील निरी रोड, अंबाझरी मार्ग, गार्डन रोड, सेमिनरी हिल्स, सिव्हिल लाईन्स मार्ग, सोनेगाव रोड, रिंगरोड ही हमखास मॉनिंग वॉकची ठिकाणे आहेत. कोरोना संक्रमण वाढल्यापासून शहरातील गार्डन आणि मैदाने बंद आहेत. यामुळे हौसेखातर फिरणाऱ्यांची संख्या आपोआपच घटली आहे. नागपुरात मागील महिन्यात संक्रमण वेगाने वाढले. यामुळे महिनाभरापासून मॉर्निंग वॉकची गर्दी बरीच कमी झाली आहे. असे असले तरी नित्यनेमाने फिरणाऱ्यांचा उपक्रम सुरूच आहे. यातही दक्षता घेताना दिसत आहे. तरुणांपेक्षा ज्येष्ठ नागरिक, दाम्पत्यांचा आणि नियमित मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांचा ग्रुप तेवढा दिसत आहे. यातही सायकलिंगवर अधिक भर दिसत आहे.

...

बॉक्स

पोलिसांकडूनही सूट

सुरुवातील मॉर्निंग वॉकच्या नावाने गर्दी करणाऱ्यांवर पोलिसांनी आणि मनपाच्या पथकाने कारवाई केली. विनामास्कने फिरणाऱ्यांवर दंड आकारला. पोलिसांनी ऊठबशा काढायलाही लावल्या. मात्र, अलीकडे गर्दी कमी झाल्याने पोलिसांकडूनही सूट दिल्यासारखे दिसत आहे. मनपाच्या पथकाने २१ मे रोजी विनामास्कने फिरणाऱ्या १४ व्यक्तींवर कारवाई केली. ४ सप्टेंबर २०२० ते २१ मे या काळात ३८,०६८ व्यक्तींवर कारवाई केली. यात मॉनिंग वॉकसह दिवसभर फिरणाऱ्यांचाही समावेश आहे.

...

खुल्या हवेसाठी धडपड !

- कोरोना संक्रमणाच्या भीतीने अलीकडे सकाळी ७.३० ते ८ वाजेपर्यंत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची गर्दी ओसरत आहे. पूर्वी ९ वाजेपर्यंत हे चालायचे.

- योगा, व्यायाम घरातच उरकून फक्त मॉर्निंग वॉकसाठी माणसे घराबाहेर पडताना दिसतात. सोशल डिस्टन्सिंगवरही भर असल्याने नागपूरकर सध्या तरी दक्षतेने वागत असल्याचे दिसत आहे.

- सायकलिंगवर सध्या अनेकांचा भर दिसत आहे. बहुतेक जण ६ ते १० किलोमीटरची रपेट मारत असतात.

...

कोरोनाची भीती वाटत नाही का?

(प्रतिक्रिया -१) वॉकिंग आणि सायकलिंग करताना पूर्ण दक्षता घेतो. कुठेच न थांबता थेट घरी परतण्यावर भर असतो. सकाळच्या सायकलिंगमुळे प्रकृतीला चांगला फायदा होत असल्याने कोरोना संक्रमणानंतर अनुभवत आहोत. मास्कचा आवर्जून वापर करतो.

- कमलेश वागदरे, खामला

...

(प्रतिक्रया - २) प्रकृती उत्तम राखण्यासाठी सकाळची सायकलिंग आणि मॉर्निंग वॉक आवश्यक आहे. आरोग्याची दक्षता घेऊन नित्य उपक्रम सुरू असल्याने कसलीही अडचण आली नाही. सकाळी लवकर निघून घरी ७.३० पूर्वी कटाक्षाने परत येतो.

- उमेश देशमुख, प्रतापनगर

...

Web Title: Morning walk for health or to bring Corona home?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.