मृत्युदर १.८८ टक्के, तर पॉझिटिव्हिटी दर १.७५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:06 AM2021-06-05T04:06:48+5:302021-06-05T04:06:48+5:30

नागपूर : कोरोनाचे संकट टळले नसले तरी स्थिती नियंत्रणात आली आहे. शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात १९७ रुग्ण व १० मृत्यूंची ...

The mortality rate is 1.88 per cent, while the positivity rate is 1.75 per cent | मृत्युदर १.८८ टक्के, तर पॉझिटिव्हिटी दर १.७५ टक्के

मृत्युदर १.८८ टक्के, तर पॉझिटिव्हिटी दर १.७५ टक्के

Next

नागपूर : कोरोनाचे संकट टळले नसले तरी स्थिती नियंत्रणात आली आहे. शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात १९७ रुग्ण व १० मृत्यूंची नोंद झाली. मृत्युदर १.८८ टक्के तर पॉझिटिव्हिटीचा दर १.७५ टक्क्यांवर आला आहे. आज शहरात १२० रुग्ण व ५ मृत्यू तर ग्रामीण भागात ७३ रुग्ण व १ मृत्यू नोंदविण्यात आले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. या धर्तीवर लवकरच कडक निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. यामुळे प्रत्येकाची जबाबदारी वाढणार आहे. पूर्वीपेक्षा अधिक सतर्क राहून कोरोना नियमांचे पालन करण्याचे व कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला दूर ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. आज ११,३५४ चाचण्या झाल्या. यात शहरात ८५४५ तर ग्रामीण भागात २८०९ चाचण्यांचा समावेश होता. शहरात आतापर्यंत ३,३१,५५६ रुग्ण व ५२६० मृत्यूंची नोंद झाली, तर ग्रामीणमध्ये १,४२,२७५ रुग्ण व २२९७ रुग्णांचे बळी गेले आहेत. जिल्ह्याबाहेरील १५६८ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून यातील १३८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

-आतापर्यंत तपासले २८ लाख नमुने

कोरोना संसर्गाचा दीड वर्षाच्या कालावधीत नागपूर जिल्ह्यात २८,४६,८१३ नमुने तपासण्यात आले. यात २०,१२,९७८ आरटीपीसीआर तर ८,३३,८३५ रॅपिड अँटिजन चाचण्यांचा समावेश होता. सर्वाधिक तपासण्या मेयो, मेडिकल, एम्स, निरी व नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत झाल्या.

-कोरोनाचे १६३३ रुग्ण भरती

सध्या शासकीयसह खासगी रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये एकूण १६३३ रुग्ण भरती आहेत. २९४२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. आतापर्यंत मेडिकलमधून १०,५१४, मेयोमधून १०,४९५, एम्समधून २,५६३, लता मंगेशकर हॉस्पिटलमधून २३३६, शालिनीताई मेघे हॉस्पिटलमधून २,६२४ यांच्यासह ४,६१,८८१ रुग्ण बरे झाले आहेत.

:: कोरोनाची शुक्रवारची स्थिती

दैनिक चाचण्या : ११,३५४

शहर : १२० रुग्ण व ५ मृत्यू

ग्रामीण : ७३ रुग्ण व १ मृत्यू

ए. बाधित रुग्ण : ४,७५,३९९

ए. सक्रिय रुग्ण : ४५७५

ए. बरे झालेले रुग्ण : ४,६१,८८१

ए. मृत्यू : ८,९४३

Web Title: The mortality rate is 1.88 per cent, while the positivity rate is 1.75 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.