कुठल्याही परिस्थितीत मृत्यूदर वाढू नये ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:09 AM2020-12-08T04:09:16+5:302020-12-08T04:09:16+5:30
उच्चस्तरीय बैठक : कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुठल्याही परिस्थितीत कोरोनाचा मृत्यूदर वाढू नये, यासाठी प्रशासनाने ...
उच्चस्तरीय बैठक : कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुठल्याही परिस्थितीत कोरोनाचा मृत्यूदर वाढू नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले. यासंदर्भात सोमवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित या बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अपर आयुक्त जलज शर्मा, अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायसवाल, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री राऊत म्हणाले, कोरोनाच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस व आरोग्य विभागाने उल्लेखनीय कार्य केले आहे. या कामाची नोंद व्हावी. कोरोना काळात कोविडसह इतर आजारांनी झालेल्या मृत्यूचा तुलनात्मक अभ्यास करून दुसऱ्या लाटेपासून कसे संरक्षण करता येईल, याची व्यवस्था व्हावी, असेही ते म्हणाले. विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी खासगी संस्थांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले. मनपा आयुक्तांनी मनपा क्षेत्रात उपलब्ध बेड, रुग्ण व बरे होण्याचे प्रमाण यावर प्रकाश टाकला.