प्राची अग्रवालला सर्वाधिक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:09 AM2021-07-07T04:09:37+5:302021-07-07T04:09:37+5:30

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९ जुलै रोजी आयोजित १०८ वा दीक्षांत समारंभातील गुणवंतांमध्ये विद्यार्थिनींचेच जास्त प्रमाण ...

Most awards to Prachi Agarwal | प्राची अग्रवालला सर्वाधिक पुरस्कार

प्राची अग्रवालला सर्वाधिक पुरस्कार

Next

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९ जुलै रोजी आयोजित १०८ वा दीक्षांत समारंभातील गुणवंतांमध्ये विद्यार्थिनींचेच जास्त प्रमाण आहे. विद्यापीठाद्वारे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्राची अग्रवाल हिचा सर्वाधिक अकरा पदके व पारितोषिकांनी सन्मान करण्यात येणार आहे. यासंदर्भात विद्यापीठाने संकेतस्थळावर अंतिम पदक व पारितोषिकांची यादी जाहीर केली आहे. यंदाच्या दीक्षांत समारंभात पदके व पारितोषिकांची संख्या १९५ इतकी राहणार आहे.

दीक्षांत समारंभात विविध विद्याशाखांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना पदके व पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येईल. १०७व्या दीक्षांत समारंभाच्या तुलनेत यंदा पदकांची संख्या एकने वाढली आहे. मात्र सहा पदके व पारितोषिकांसाठी पात्र उमेदवार मिळालेले नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात १८९ पदके-पारितोषिके देण्यात येतील. प्राची अग्रवालला ‘एलएलबी’त (पाच वर्षीय अभ्यासक्रम) सर्वाधिक ‘सीजीपीए’ प्राप्त केल्याबद्दल सन्मानित करण्यात येईल. त्यापाठोपाठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचा विद्यार्थी आदित्य खोडे व विद्यापीठाच्या पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागातील एम.एस्सी.ची विद्यार्थिनी गौरी जोशी यांचा प्रत्येकी सात पदके व पुरस्कारांनी सन्मान करण्यात येईल. विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागातील विद्यार्थी अमोल धाकडे व अंजुमन महाविद्यालयातील बी.ई.ची विद्यार्थिनी पूनम बेलेकर यांचा सहा पदके-पारितोषिकांनी सन्मान करण्यात येईल.

पुरस्कार मिळणार केव्हा?

कोरोनाच्या निर्बंधांमुळे दीक्षांत समारंभ ऑनलाइन माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे. अशा स्थितीत गुणवंतांना नंतर पुरस्कार देण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. या विद्यार्थ्यांना पदके व पारितोषिके नेमके प्रदान करणार हा प्रश्न कायम आहे.

प्रत्येक विद्याशाखेतून दोन विद्यार्थ्यांना बोलवावे

शासकीय निर्बंधांमुळे दीक्षांत सभागृहात ५० लोकांचीच उपस्थिती राहणार आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना प्रवेश राहणार नाही. मात्र प्रत्येक विद्याशाखेतील एक-एक गुणवंत व एक-एक पीएचडी उमेदवाराला प्रातिनिधिक स्वरूपात निमंत्रित करण्यात यावे, असा विद्यापीठ वर्तुळात सूर आहे. यासंदर्भात प्रशासनालाच अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे.

हे आहेत गुणवंत

नाव - अभ्यासक्रम - महाविद्यालय - पदके-पारितोषिक

प्राची अग्रवाल - बीए, एलएलबी (५ वर्षे)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील- ११

आदित्य खोडे - एमबीए - डॉ. बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट स्टडीज- ७

गौरी जोशी - एमएस्सी (रसायनशास्त्र)- पदव्युत्तर रसानयशास्त्र विभाग, नागपूर विद्यापीठ- ७

अमोक धाकडे - एम.ए. (आंबेडकर विचारधारा)- पदव्युत्तर आंबेडकर विचारधारा विभाग, नागपूर विद्यापीठ- ६

पूनम बेलेकर - बी.ई.- अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालय- ६

पूजा बुरडकर - एम.ए. (मराठी) -वसंतराव नाईक शासकीय कला महाविद्यालय- ५

श्वेता कामडी - बी.जे. -जनसंवाद विभाग, नागपूर विद्यापीठ- ४

Web Title: Most awards to Prachi Agarwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.