मानसिक आव्हाने पेलण्यास स्त्री सर्वात सक्षम ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:08 AM2021-03-09T04:08:09+5:302021-03-09T04:08:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्‍त्रीमध्‍ये अपार शक्‍ती असून ती पुरुषांपेक्षा सर्वाधिक मानसिक आव्‍हाने पेलण्‍यास समर्थ असते. त्‍यामुळे तिचा ...

The most capable woman to face mental challenges () | मानसिक आव्हाने पेलण्यास स्त्री सर्वात सक्षम ()

मानसिक आव्हाने पेलण्यास स्त्री सर्वात सक्षम ()

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्‍त्रीमध्‍ये अपार शक्‍ती असून ती पुरुषांपेक्षा सर्वाधिक मानसिक आव्‍हाने पेलण्‍यास समर्थ असते. त्‍यामुळे तिचा आदर करण्याचे आवाहन स्‍त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चैतन्‍य शेंबेकर यांनी केले. ‘'पत्रभेट’च्‍या वतीने पूज्‍यनीय आक्‍काई यांच्‍या स्‍मृतिप्रीत्‍यर्थ व जागतिक महिला दिनाच्‍या निमित्ताने ‘मन करा रे प्रसन्‍न’ हा आभासी कार्यक्रम पार पडला. यावेळी शेंबेकर आपल्या भावना व्यक्त करीत होते. यावेळी मुंबईच्‍या डॉ. कीर्ती समुद्र व अकोल्‍याच्‍या डॉ. शुभांगी देशपांडे यांनी सहभाग नोंदविला. डॉ. शेंबेकर यांनी ‘स्‍त्री अनंत काळाची माता’ या विषयावर आपले विचार प्रकट केले. स्‍त्रीला अनेक टप्‍प्‍यातून जावे लागते. गर्भावस्‍थेत मेनोपॉजचे वय तिच्‍या मनावर दडपण आणणारे ठरते. योग्‍य आहार, व्‍यायाम, कुटुंबाची साथ मिळाली तर ती सक्षमपणे उभी राहू शकते. तिचे आरोग्‍य राखणे ही सर्वच कुटुंबाची जबाबदारी आहे, असे डॉ. शेंबेकर म्‍हणाले.

डॉ. कीर्ती समुद्र यांनी ‘अचपळ मन माझे’ विषयावर तर डॉ. शुभांगी देशपांडे यांनी ‘मानसिक बदल’ यावर भाष्‍य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रज्ञा फडणीस यांनी केले तर डॉ. रेवती देशपांडे यांनी आभार मानले.

...........

Web Title: The most capable woman to face mental challenges ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.