कोरोना काळात सर्वाधिक तक्रारी बेडच्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:09 AM2021-07-14T04:09:44+5:302021-07-14T04:09:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिका मुख्यालयात कोरोना वॉर रूम सुरू करण्यात आली. येथील हेल्पलाईनवर एप्रिल महिन्यात कॉल्सचे ...

Most Complaints Bed in Corona Period! | कोरोना काळात सर्वाधिक तक्रारी बेडच्या!

कोरोना काळात सर्वाधिक तक्रारी बेडच्या!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिका मुख्यालयात कोरोना वॉर रूम सुरू करण्यात आली. येथील हेल्पलाईनवर एप्रिल महिन्यात कॉल्सचे प्रमाण प्रचंड वाढले होते. तीन पाळ्यांत डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली होती. सर्वाधिक तक्रारी बेड मिळत नाही. ऑक्सिजन उपलब्ध, रेमडेसिविर मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. आता व्हॅक्सिनबाबत विचारणा करण्यासाठी सर्वाधिक कॉल येत आहेत.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करणे, विलगीकरण, क्वारंटाईन सेंटर यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांना डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी कॉल येत होते. परंतु, जून महिन्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरताच बेड उपलब्धतेबाबत येणारे कॉल जवळपास बंद झाले आहेत. आता व्हॅक्सिनेशनसाठी कॉल येत आहेत. यात प्रामुख्याने १८ वर्षांवरील तरुणांचा समावेश आहे.

....

आता बेडसाठी कॉल नाही

एप्रिल महिन्यात कोरोना संक्रमणाचा प्रकोप सुरू असताना हेल्पलाईनवरील कर्मचाऱ्यांना सतत कॉल येत होते. मात्र, जून महिना सुरू होताच रुग्णांची संख्या कमी झाल्याने मागील दोन आठवड्यांत हेल्पलाईनवर येणारे कॉल कमी झाले आहेत. जुलै महिन्यात १२ तारखेपर्यंत बेडसंदर्भात एकही कॉल आला नाही. आरोग्याविषयी माहिती विचारली गेली नाही. मात्र, लसीकरणाबाबत विचारणा होत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

...

आम्हाला लस कधी मिळणार?

१८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु, लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने ३० वर्षांवरील नागरिकांना १०६ केंद्रांवर लसीचे डोस दिले जात होते. आता १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. पण मागणीनुसार पुरवठा होत नाही. मनपाच्या हेल्पलाईनवर कॉल करून विचारणा करतात. आज लस मिळणार का ? यासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची, कुठली लस उपलब्ध आहे.

.........

- पहिल्या लाटेत आलेले एकूण कॉल्स -५०,०००

-दुसऱ्या लाटेत आलेले कॉल्स - १,५००००

-रुग्णालयात बेड मिळण्यासाठी - ३,०००

-ऑक्सिजन मिळत नसल्याबाबत -१,५००

-रेमडेसिविर मिळत नसल्याबाबत -१,२००

(सर्व कॉलची नोंद होत नसल्याने यात बदल असू शकतो. )

Web Title: Most Complaints Bed in Corona Period!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.