नागपुरातील प्रभाग तीन व सातचा बहुतांश परिसर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 11:26 PM2020-04-13T23:26:07+5:302020-04-13T23:27:19+5:30

कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात होऊ नये म्हणून नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता महापालिका हद्दीतील आशीनगर झोनअंतर्गत येणारा प्रभाग क्र. ३ आणि सतरंजीपुरा झोनअंतर्गत येणारा प्रभाग क्र. ७ मधील बहुतांश परिसर सील करण्यात आला आहे.

Most of the premises of Nagpur Division three and seven sealed | नागपुरातील प्रभाग तीन व सातचा बहुतांश परिसर सील

नागपुरातील प्रभाग तीन व सातचा बहुतांश परिसर सील

Next
ठळक मुद्देमनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश : कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रतिबंधित क्षेत्रात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात होऊ नये म्हणून नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता महापालिका हद्दीतील आशीनगर झोनअंतर्गत येणारा प्रभाग क्र. ३ आणि सतरंजीपुरा झोनअंतर्गत येणारा प्रभाग क्र. ७ मधील बहुतांश परिसर सील करण्यात आला आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी याबाबतचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार आशीनगर झोन क्रमांक ९ आणि सतरंजीपुरा झोन क्रमांक ७ अंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. ३ आणि ७ च्या उत्तर-पश्चिमेस इटाभट्टी चौक रिंग रोड, उत्तरेस पिवळी नदी वनदेवी नगर, पूर्वेस कळमना गेट क्र. १ कोराडी लाईन, दक्षिण-पश्चिमेस कावरापेठ शांतीनगर रेल्वेगेट, पश्चिमेस कांजीहाऊस चौक बिनाकी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करून या भागाच्या सीमा आवागमनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच्या आदेशानुसार प्र्रभाग क्रमांक ८ मधील तकिया दिवानशहा मोमिनपुरा, या भागातील कॅन्टोन्मेंट एरिया (उत्तर-पूर्वेस तीन खंबा चौक, दक्षिण-पूर्वेस नालसाहब चौक, दक्षिण-पश्चिम भगवाघर चौक, पश्चिमेस जामा मशीद, उत्तर-पश्चिमेस मोमिनपुरा चौक) क्षेत्र प्रतिबंधित घोषित करण्यात आले होते. या क्षेत्रात वाढ करण्यात आली. त्यानुसार उत्तर-पश्चिमेस ए-मोतीबाग रेल्वे ब्रीज, उत्तर-पूर्वेस बी-पाचपावली रेल्वे ब्रीज, दक्षिण-पूर्वेस सी-अग्रसेन चौक व डी-पोद्दारेश्वर राममंदिर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे, तसेच आधीच्या आदेशानुसार गांधीबाग-महाल झोन क्रमांक ६ आणि सतरंजीपुरा झोन क्रमांक ७ अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक २१ व २२च्या उत्तर-पूर्वेस ए.एम.ए. कंपनी मालधक्का रोड, दक्षिण-पूर्वेस उमिया शंकर शाळा, दक्षिण-पश्चिमेस मासुरकर चौक, उत्तर-पश्चिमेस हॉटेल मदिना, पूर्वेस बोधिसत्त्व बुद्धविहार, प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. सुधारित आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्राची व्याप्ती वाढली आहे.

अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे

Web Title: Most of the premises of Nagpur Division three and seven sealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.