खापा सर्कलमध्ये सर्वाधिक पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:12 AM2021-02-18T04:12:38+5:302021-02-18T04:12:38+5:30

--- ढगाळ वातावरण भिवापूर तालुक्यात मंगळवारी रात्रीपासून ढगाळ वातावरण आहे. वातावरणात गारवा आल्यामुळे थंडी वाढली आहे. मात्र पाऊस नाही. ...

Most rainfall in Khapa circle | खापा सर्कलमध्ये सर्वाधिक पाऊस

खापा सर्कलमध्ये सर्वाधिक पाऊस

Next

---

ढगाळ वातावरण

भिवापूर तालुक्यात मंगळवारी रात्रीपासून ढगाळ वातावरण आहे. वातावरणात गारवा आल्यामुळे थंडी वाढली आहे. मात्र पाऊस नाही. वातावरणात अचानक झालेला बदल शेतातील उभ्या पिकांना नुकसानकारक ठरू शकतो. सध्या हरभरा, गहू व मिरची पिके शेतात उभी आहे.

---

मानवी आरोग्यावरही परिणाम

ढगाळ वातावरण व गारव्यामुळे मानवी आरोग्यावर सुद्धा परिणाम होत आहे. सर्दी, खोकला व तापाच्या रूग्णात वाढ होत आहे. महत्वाचे म्हणजे गत आठवडाभरापासून महानगरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अशात वातावरणातील बदलही आरोग्यावर परिणामकारक ठरत आहे.

---

किडीच्या प्रादुर्भावाचा धोका

काटोल तालुक्यात बुधवारी पावसाने हजेरी लावली. रिमझिम पावसाने कोठेही मोठे नुकसान झाल्याचे दिसून आलेले नाही. मात्र वातावरण असेच राहिले तर पिकावर किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. आवश्यकता पडल्यास शेतकऱ्यांनी बुरशीनाशक औैषधाची फवारणी करावी असे तालुका कृषी अधिकारी सुरेश कन्नाके यांनी सांगितले.

Web Title: Most rainfall in Khapa circle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.