सासूचा दात पाडला जामीनावर सुटला

By admin | Published: February 28, 2016 03:07 AM2016-02-28T03:07:38+5:302016-02-28T03:07:38+5:30

सासूला जबर मारहाण करून चक्क दात पाडला. साळीचाही विनयभंग केला. पोलिसांनी या दोन्ही घटनांची गंभीर दखल न घेतल्याने न्यायालयाने आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

The mother-in-law was released on bail | सासूचा दात पाडला जामीनावर सुटला

सासूचा दात पाडला जामीनावर सुटला

Next

नागपूर : सासूला जबर मारहाण करून चक्क दात पाडला. साळीचाही विनयभंग केला. पोलिसांनी या दोन्ही घटनांची गंभीर दखल न घेतल्याने न्यायालयाने आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला.
ही घटना ३ फेब्रुवारी रोजी अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत द्वारकापुरी येथे घडली होती.
प्रवीण तंत्रपाळे, असे आरोपीचे नाव आहे. तो द्वारकापुरी येथे राहतो. याच भागात राहणारी एक दुर्दैवी महिला १ फेब्रुवारी रोजी आजारी मुलीला घेण्यासाठी तिच्या घरी गेली होती. मुलीला तिने आपल्या घरी नेऊन उपचार करून दोन दिवसानंतर तिला घरी पोहचवून दिले होते. सोबत तिने आपल्या मोठ्या मुलीला घेतले होते. प्रवीण हा तिचा जावई आहे. माझ्या पत्नीला का घेऊन गेले, अशी विचारणा करीत प्रवीण त्याचे अन्य नातेवाईक अमोल, श्यामराव आणि बेबी तंत्रपाळे यांनी या दोघांना मारहाण केली होती. प्रवीण याने सासूच्या तोंडावर ठोसा मारून तिचा एक दात पाडला होता. ती बेशुद्ध झाली होती. प्रवीणने चक्क आपल्या साळीचा विनयभंग केला होता.
या घटनेनंतर या महिलेच्या मुलाने पोलीस नियंत्रण कक्षाला १०० क्रमांकावर फोन करून घटनेची सूचना दिली होती. तब्बल आठ-दहा दिवसानंतर १२ फेब्रुवारी रोजी अजनी पोलिसांनी भादंविच्या ३५४, ३२५, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. मुख्य आरोपी प्रवीण तंत्रपाळे याने न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करताच त्याला जामीन मंजूर करण्यात आला. पोलिसांनी या घटनेची त्वरित दखल न घेता उशिरा गुन्हा दाखल करून संशय निर्माण केल्याने आरोपीला जामीन मंजूर झाला. (प्रतिनिधी)

Web Title: The mother-in-law was released on bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.