आई- मुलाची एकाचवेळी विक्रमी झेप सुप्रिया, शिवांश यांची इंडिया - आशिया रेकॉर्ड्स बुकमध्ये झाली नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 03:51 PM2024-08-14T15:51:09+5:302024-08-14T15:54:02+5:30

Nagpur : ६ मिनिटे २१ सेकंदांत उपस्थितांपुढे भराभर कलमे वाचून विक्रम

mother-son jump record in India-Asia records book | आई- मुलाची एकाचवेळी विक्रमी झेप सुप्रिया, शिवांश यांची इंडिया - आशिया रेकॉर्ड्स बुकमध्ये झाली नोंद

mother-son jump record in India-Asia records book

किशोर बागडे

नागपूर: सुप्रिया कुमार मसराम आणि त्यांचा ११ वर्षांचा मुलगा शिवांश यांनी मंगळवारी एकाचवेळी निर्धारित वेळेच्या आधी आपापले उद्दिष्ट गाठताना इंडिया आणि आशिया रेकॉर्ड्स बुकमध्ये नोंद केली. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुप्रिया यांनी संविधानातील ७५ कलमे तोंडपाठ वाचून दाखविली. त्यांनी दहा मिनिटांचा कालावधी निश्चित केला होता, पण अवघ्या ६ मिनिटे २१ सेकंदांत उपस्थितांपुढे भराभर कलमे वाचून विक्रम केला. सिव्हील लाईन्स येथील चिटणीस सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


त्याआधी भवन्स स्कूलमध्ये पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या शिवांशने विज्ञानाच्या पुस्तकातील शंभर पानांवर अधोरेखित असलेले शब्द न पाहता उपस्थितांना अवघ्या ८ मिनिटे पाच सेकंदांत अचूक सांगितले. एक ते शंभर पानांचे नंबर उलट- सूलट विचारल्यानंतरही पानांवरील मजूकर शिवांशने आत्मविश्वासाने उच्चारला. मोठे होऊन आयएएस अधिकारी बनायचीे इच्छा शिवांशने व्यक्त केली.


आई आणि मुलाचा सत्कार माजी खा. अशोक नेते,डाॅ. उदय बोधनकर, रवींद्र भुसारी, प्रा.डॉ. श्रीराम सोनवणे, इंडिया आणि आशिया बुक रेकॉर्ड्सचे संयोजक डॉ. मनोज तत्ववादी, सुप्रिया यांच्या मेंटर वैशाली कोढे आणि शिवांशच्या मेंटर गौरी कोढे यांच्याहस्ते मायलेकांना मेडल्स, प्रशस्तीपत्र,भेटवस्तु आणि पुष्षगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवांशचे वडील कुमार मसराम व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आरजे फरहान यांनी केले. सर्व उपस्थितांना भारतीय संविधानाच्या प्रास्तविकेचा फोटो भेट म्हणून देण्यात आला. विक्रमाची नोंद होताच किशोर बागडे, डॉ. प्रवीण मानवटकर, अजय सोनटक्के, सतीश मेश्राम, गोडबोले,डॉ. संजय जैस्वाल,आनंद शर्मा यांच्यासह अनेकांनी आई आणि मुलाचे अभिनंदन केले.

Web Title: mother-son jump record in India-Asia records book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर