जन्मानंतर पहिल्यांदाच आईचा चिमुकलीला स्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 11:54 PM2020-05-13T23:54:21+5:302020-05-14T00:05:44+5:30

इकडे प्रसुती होत नाही तर तिकडे तिचे नमुने पॉझिटिव्ह आले. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून चिमुकलीला मातेपासून दूर ठेवले. सलग १५ दिवस ती चिमुकली मातेपासून दूर होती. त्या दोघीही एकमेकांसाठी आसुसल्या होत्या. आज मातेचे नमुने निगेटिव्ह आले, आणि पहिल्यांदाच मातेच्या हातात चिमुकलीला दिले.

Mother's touch to Child for the first time after birth | जन्मानंतर पहिल्यांदाच आईचा चिमुकलीला स्पर्श

जन्मानंतर पहिल्यांदाच आईचा चिमुकलीला स्पर्श

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इकडे प्रसुती होत नाही तर तिकडे तिचे नमुने पॉझिटिव्ह आले. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून चिमुकलीला मातेपासून दूर ठेवले. सलग १५ दिवस ती चिमुकली मातेपासून दूर होती. त्या दोघीही एकमेकांसाठी आसुसल्या होत्या. आज मातेचे नमुने निगेटिव्ह आले, आणि पहिल्यांदाच मातेच्या हातात चिमुकलीला दिले. आईच्या पहिल्या स्पर्शाने चिमुकलीने स्मित केले, आईच्या डोळ्यात अश्रू तरळले तर डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या चेहºयावर कर्तव्याचे समाधान पसरले.
मोमीनपुरा येथील २६ वर्षीय महिला आपल्या एका नातेवाईकासोबत २८ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता मेयोच्या स्त्री रोग व प्रसुती विभागात भरती झाली. ‘रेड झोन’ वसाहतीमधील असल्याने तिचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. बुधवारी सकाळी ६.३० वाजता अचानक तिच्या पोटात दुखू लागले. तिला प्रसुती कक्षात नेले. सकाळी ७.३०वाजता नॉर्मल प्रसुती झाली. तिने मुलीला जन्म दिला. सुरक्षेचे साधने घालूनच डॉक्टरांनी ही प्रसुती केली. प्रसुतीनंतर १५ मिनिटांनी प्रसूत महिला पॉझिटिव्ह आल्याची माहिती पुढे आली. यामुळे प्रसुती करणारे दोन डॉक्टर, दोन परिचारिका व दोन सफाई कर्मचाऱ्यांचे नमुने घेत त्यांना रुग्णालयातच क्वॉरंटाईन करण्यात आले. आईपासून चिमुकलीला कोरोना होऊ नये म्हणून डॉक्टरांनी तिला ‘एनआयसीयू’मध्ये ठेवले. प्रसूत मातेची बहीण आणि चिमुकलीची मावशी मदतीला आली. मातेचे दूध घेऊन ती ‘एनआयसीयू’मध्ये जाऊन चिमुकलीला चमच्याने पाजत होती. आईच्या स्पर्शासाठी आसुसलेली चिमुकली खूप रडायची. तिकडे कधी एकदा चिमुकलीला कुशीत घेते असे झाले होते. परतु डॉक्टर, परिचारका सर्वच तिला समजावत होते. तीही समजून घेत होती. अखेर १४ दिवस पूर्ण झाले. पहिल्या दिवशी तिचा नमुना निगेटिव्ह आला. २४ तासानंतर आज पुन्हा नमुना तपासण्यात आला. यातही ती निगेटिव्ह आली. तिच्या रुग्णालयातून सुटीचे पेपर तयार करण्यात आले. वॉर्डाबाहेर एक खुर्ची ठेवली. तिला बसविले. एका परिचारिकेने अलगद तिच्या हातात बाळ ठेवले. आईच्या स्पर्शासाठी आसुलेले बाळ स्मितहास्य करीत कुशीत शिरले, मातेच्या डोळ्यात अश्रू होते. या प्रसंगाने काही वेळेसाठी तिची मावशी, तिथे उपस्थित डॉक्टर, परिचारिक व आणि कर्मचारीही भावूक झाले होते.
मातेपासून ती चिमुकली दूर असली तरी डॉक्टर, परिचारिकेची एक चमू तिच्या आरोग्यावर लक्ष ठेवून होती. यात बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर बोकडे, स्त्री रोग व प्रसुती विभागाचे डॉ. प्रशांत उईके, औषधवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. तिलोत्तमा पराते, कोविड वॉर्डात त्या मातेच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून असलेल्या मेडिसीन विभागाच्या प्रा.डॉ. मृणाल हरदास, मेट्रन साधना गावंडे आणि त्यांचा स्टाफ, आणि याचे नियोजन अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवी चव्हाण व उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी केले होते.

Web Title: Mother's touch to Child for the first time after birth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.