मुलीच्या श्वासासाठी आईची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:57 AM2017-09-12T00:57:19+5:302017-09-12T00:57:38+5:30

सहा वर्षांच्या चिमुकलीला तिच्या आईने बेशुद्धावस्थेतच धावपळ करीत रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासून सिटी स्कॅन करण्यास सांगितले.

Mother's tragedy for the girl's breath | मुलीच्या श्वासासाठी आईची धडपड

मुलीच्या श्वासासाठी आईची धडपड

Next
ठळक मुद्देमेयोतील प्रकार : सुवर्ण महोत्सवी वर्षातही स्थितीत बदल नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सहा वर्षांच्या चिमुकलीला तिच्या आईने बेशुद्धावस्थेतच धावपळ करीत रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासून सिटी स्कॅन करण्यास सांगितले. चिमुकलीच्या तोंडाला मास्क लावून आॅक्सिजन सिलिंडर नातेवार्इंकाच्या हातात दिले. आईने मुलीला कडेवर घेतले, दुसºयाने सिलिंडर ओढणे सुरू केले. जागोजागी पडलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सिलिंडर उसळत होते. तोंडावरील मास्क निघत होता. आईच्या जीवाची घालमेल होत होती. रुग्णाच्या श्वासाची ही धडपड मेयोसाठी नवीन नाही. सुवर्ण महोत्सवी वर्षात हे रुग्णालय पदार्पण करीत असतानाही रुग्णालयाच्या स्थितीत जरासाही बदल झालेला नाही, हे धक्कादायक वास्तव आहे.
१८६२ मध्ये ‘सिटी हॉस्पिटल’च्या नावाने सुरू झालेला धर्मदाय दवाखाना आज ‘मेयो’च्या नावाने विदर्भच नाहीतर आजूबाजूच्या पाच राज्यांमध्ये प्रसिद्ध आहे. मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या नियमानुसार एकाच ठिकाणी सर्व अद्ययावत सोयी असणे आवश्यक असताना या रुग्णालयातील विविध विभागांच्या इमारती विखुरल्या आहेत.
इनहाऊस अ‍ॅम्ब्युलन्सची प्रतीक्षा
रुग्णालयात जीवनरक्षक उपकरणांसोबतच स्ट्रेचर आणि अटेन्डन्सचीही महत्त्वाची भूमिका असते. परंतु मेयोत या दोन्ही गोष्टींची वानवा आहे. यातही स्ट्रेचर ब्रिटिशकालीन आहेत. दोन चाकांचे हे स्ट्रेचर राज्यात केवळ मेयोमध्येच दिसून येते. या स्ट्रेचरवर झोपून रुग्णाला १०० मीटरचे अंतर कापणेही कठीण जाते. यातच रस्त्यावरील जागोजागी असलेले खड्डे आजाराचे दुखणे आणखी वाढविते. याला घेऊन ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यावर लाखो रुपये खर्चून नऊ ई-रिक्षा घेतल्या. यातील तीन रिक्षांमध्ये रुग्णांना झोपवून नेण्यासाठी ‘इनहाऊस अ‍ॅम्ब्युलन्स’चे स्वरूप दिले. परंतु अद्यापही या रिक्षा रुग्णसेवेपासून दूर आहेत.

Web Title: Mother's tragedy for the girl's breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.