शेतातील मोटरची चोरी, दोघे पोलिसांच्या जाळ्यात
By दयानंद पाईकराव | Updated: May 21, 2024 15:50 IST2024-05-21T15:50:26+5:302024-05-21T15:50:58+5:30
Nagpur : दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट कडून अटक

Motor theft, thieves are under custody
नागपूर : शेतातील पाण्याची मोटर आणि तांब्याची तार चोरी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट १ ने अटक करून हिंगणा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. योगेशकुमार ओवाराम शाहु (३६, रा. परसोडी, जि. जमशेदपूर, झारखंड) आणि विलास भगवान इंगळे (२४, रा. मोहगाव देवी, जि. भंडारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे अधिकारी व अंमलदार सोमवारी २० मे रोजी सकाळी ८ वाजता गस्त घालत होते. त्यांना योगेशकुमार आणि विलास संशयास्पद स्थितीत आढळले. त्यांना थांबवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळ सब मर्सिबल पाण्याची मशीन व केबल जाळून काढलेली तांब्याची तार असा एकुण २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल आढळला. मोटर आणि तार जामठा येथील दिलीप हिंगे यांच्या शेतातून चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यांच्या विरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना हिंगणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.