भरधाव मोटरसायकल टेम्पोवर धडकली, कन्हानच्या तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 20:10 IST2019-04-27T20:09:46+5:302019-04-27T20:10:24+5:30
भरधाव मोटरसायकल टेम्पोवर आदळल्याने मोटरसायकल चालकाचा करुण अंत झाला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी १.३० वाजता हा अपघात घडला.

भरधाव मोटरसायकल टेम्पोवर धडकली, कन्हानच्या तरुणाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरधाव मोटरसायकल टेम्पोवर आदळल्याने मोटरसायकल चालकाचा करुण अंत झाला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी १.३० वाजता हा अपघात घडला. सागर महेश प्रसाद (वय ३५) असे मृत मोटरसायकल चालकाचे नाव आहे. तो कन्हानचा रहिवासी होता.
सचिन रामभाऊजी सिंगारे (वय ३४, रा. चिचोली, कळमेश्वर) हा त्याच्या टेम्पोने (एमएच ४०/ एन ०८६०) एमआयडीसीतून जात असताना भरधाव वेगात आलेल्या सागरची मोटरसायकल टेम्पोवर धडकली. त्यामुळे सागर गंभीर जखमी झाला. त्याला डॉक्टरकडे नेले असता मृत घोषित करण्यात आले. एमआयडीसी पोलिसांनी सिंगारेच्या तक्रारीवरून अपघाताची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.