बसच्या धडकेत मोटरसायकलस्वाराचा करुण अंत

By Admin | Published: April 23, 2017 03:04 AM2017-04-23T03:04:54+5:302017-04-23T03:04:54+5:30

निष्काळजीपणे वाहन चालवून बसचालकाने मोटरसायकलस्वाराला धडक मारल्यामुळे त्याचा करुण अंत झाला.

Motorcycle riding carriage end | बसच्या धडकेत मोटरसायकलस्वाराचा करुण अंत

बसच्या धडकेत मोटरसायकलस्वाराचा करुण अंत

googlenewsNext

नागपूर : निष्काळजीपणे वाहन चालवून बसचालकाने मोटरसायकलस्वाराला धडक मारल्यामुळे त्याचा करुण अंत झाला. लक्ष्मण सोमाजी बोबडे असे मृताचे नाव आहे. ते कळमन्यातील डिप्टीसिग्नल भागात राहात होते. शुक्रवारी दुपारी ३ वाजता बोबडे मोटरसायकलने कॉटनमार्केट चौकातून जात असताना आरोपी चंद्रशेखर शामराव उमक याने निष्काळजीपणे बस (एमएच ४०/ एक्यू ६३०८) चालवून बोबडेंना चिरडले. गंभीर जखमी झालेल्या बोबडे यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सायंकाळी ५ च्या सुमारास डॉक्टरांनी बोबडेंना मृत घोषित केले. वाहतूक शाखेचे कर्मचारी संजय फागोजी परतेकी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी आरोपी बसचालक उमकविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.(प्रतिनिधी)

Web Title: Motorcycle riding carriage end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.