ट्रिपल आयटी नागपूर आणि डिफेन्स यांच्यात सामंजस्य करार
By आनंद डेकाटे | Published: July 19, 2024 04:16 PM2024-07-19T16:16:57+5:302024-07-19T16:21:24+5:30
Nagpur : गुरूवारी पार पडलेल्या कार्यक्रमात करारावर स्वाक्षरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तंत्रज्ञान उपयोजन आणि संशोधन उपक्रम यासह अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्दिष्टाने भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थान, नागपूर (ट्रिपल आयटी)) आणि राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी नागपूर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. गुरूवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
दोन्ही प्रतिष्ठित संस्थांनी संशोधन सहकार्य वाढवण्यासाठी, नवकल्पना वाढवण्यासाठी आणि राष्ट्रीय संरक्षणासाठी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाला गती देण्यासाठी या धोरणात्मक भागीदारीत प्रवेश केला. भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर कॅम्पसमध्ये झालेल्या स्वाक्षरी समारंभात ट्रिपल आयटी नागपूरचे संचालक प्राध्यापक ओ. जी. काकडे, कुलसचिव कैलास डाखळे, डॉ. मयूर पराते, डॉ. प्रसाद जोशी, डॉ. निशात अंसारी, डॉ. मिलिंद पेनुरकर, डॉ. रीचा मखीजानी आणि राष्ट्रीय रक्षा उत्पादन अकादमीचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. जे. पी. दाश, महाव्यवस्थापक डॉ. एएस. खान, एस.ए. एन. मूर्ति, मिन्हाज़ अहमद (डीजीएम), आणि एन. रघुरामन उपस्थित होते.