उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात नव्या पाहुण्यांची हालचाल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 09:09 PM2021-11-15T21:09:38+5:302021-11-15T22:40:45+5:30

Nagpur News उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात अलीकडे नव्या लहानग्या ‘वाघ’ पाहुण्यांची हालचाल दिसत आहे. या पाहुण्यांमुळे या अभयारण्यात नवे चैतन्य निर्माण होण्याची सुखद अपेक्षाही आता व्यक्त व्हायला लागली आहे.

Move of new visitors to Umred-Karhand Sanctuary! | उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात नव्या पाहुण्यांची हालचाल !

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात नव्या पाहुण्यांची हालचाल !

googlenewsNext
ठळक मुद्देकॉलरवाल्या वाघिणीच्या पगमार्कसोबत दिसली बछड्यांचीही पावले

नागपूर : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात अलीकडे नव्या लहानग्या ‘वाघ’ पाहुण्यांची हालचाल दिसत आहे. या पाहुण्यांमुळे या अभयारण्यात नवे चैतन्य निर्माण होण्याची सुखद अपेक्षाही आता व्यक्त व्हायला लागली आहे. कऱ्हांडला अभयारण्यातील प्रसिद्ध असलेली कॉलरवाली वाघीण टी-१च्या पगमार्कसोबत काही बछड्यांचेही अस्पष्ट असे पगमार्क आढळल्याने व्याघ्रप्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

अद्यापतरी वाघीण आपल्या बछड्यांसोबत मुक्तपणे बाहेर फिरताना आढळलेली नाही. जंगलात वनविभागाने कॅमेरा ट्रॅप लावला असून, त्यात वाघीण एकटीच दिसत आहे तर अनेकदा ती कॅमेरामागून जात आहे. याच दरम्यान तिच्या पगमार्कसोबत काही बछड्यांचे पगमार्कही अस्पष्टपणे पाहण्यात आले आहेत. यामुळे वनकर्मचारी या काॅलरवाल्या वाघिणीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, एका वन अधिकार्यानेही बछड्यांच्या पगमार्कच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

वाघीण टी-१ ला दोन वर्षांपूर्वी तीन नर बछडे झाले होते. मात्र कऱ्हांडलामध्ये सूर्या या दमदार वाघाचा प्रवेश झाला. त्याने या तीनही बछड्यांना मारून टाकले. त्यानंतर या वाघिणीला बरेचदा सूर्यासोबत फिरताना पाहण्यात आले होते. दरम्यान, वाघीण टी-१ गर्भवती राहिली होती. पावसाळ्याच्या दिवसात मात्र ती दिसत नव्हती. याच दरम्यान तीने ऑगस्ट-सप्टेबरमध्ये बछड्यांना जन्म दिला असावा, असा अंदाज आहे. हे बछडे दोन ते अडीच महिन्यांचे असू शकतात. यामुळेच वाघीण त्यांची विशेष काळजी घेत असावी. काही महिन्यात ते मोठे झाल्यावर आईसोबत दिसतील, असा अंदाज आहे.

जय अचानकपणे झाला बेपत्ता

यापूर्वी उमरेड-कऱ्हांडला जय वाघामुळे चर्चेत आला होता. त्यानंतर अचानकपणे जुलै-२०१६ मध्ये तो बेपत्ता झाला. त्यामुळे पर्यटकांची निराशा झाली. मात्र यानंतर अभयारण्यातील वाघीण टी-३ आपल्या बछड्यांसोबत फिरताना दिसायची. यामुळे पुन्हा अभयारण्यात चैतन्य आले. ती आता गोठणगाव क्षेत्रात बछड्यांसोबत फिरताना दिसते.

...

Web Title: Move of new visitors to Umred-Karhand Sanctuary!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ