पालकांना त्रास देणाऱ्या प्रत्येक शाळेसमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:07 AM2021-06-11T04:07:15+5:302021-06-11T04:07:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनामुळे अनेकांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली असून, या स्थितीत मुलांच्या शाळेचे शुल्क भरणे कठीण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे अनेकांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली असून, या स्थितीत मुलांच्या शाळेचे शुल्क भरणे कठीण झाले आहे. मात्र काही शाळांनी शुल्कात दिलासा देण्याऐवजी पालकांना सातत्याने त्रास देणे सुरू केले आहे. अशा प्रत्येक शाळेसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे देण्यात आला आहे. अनेक शाळांनी वाढविलेल्या शुल्काविरोधात भाजयुमोतर्फे आंदोलन करण्यात आले.
कोरोनामुळे शैक्षणिक सत्रांवरही त्याचा मोठा परिणाम झाला. शाळा पूर्णपणे बंद असल्यामुळे शाळांचा व्यवस्थापन खर्च कमी झाला. याशिवाय अनेक शाळांनी आपल्या शिक्षकांना अर्धाच पगार दिला. त्यामुळे काही प्रमाणात पालकांना दिलासा देणे अपेक्षित होते, परंतु शाळांनी पालकांना दिलासा न देता शुल्क वाढविले आहे. ज्यांनी अगोदरचे शुल्क दिले नाही त्यांना मानसिक त्रास देण्यात येत आहे, असा आरोप करत भाजयुमोतर्फे मानेवाडा येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आले.