'जामिया विद्यापीठातील आंदोलनात विद्यार्थी नव्हतेच, राधाकृष्ण विखे पाटलांचा वेगळाच तर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 03:24 PM2019-12-18T15:24:06+5:302019-12-18T15:25:42+5:30

देशभरात सुरू असलेलं आंदोलन हे जनतेचं आंदोलन नसून राजकीय पक्षांचं आहे

'Movement of Jamia University involves non-students, its political people', radhakrishana vikhe patil | 'जामिया विद्यापीठातील आंदोलनात विद्यार्थी नव्हतेच, राधाकृष्ण विखे पाटलांचा वेगळाच तर्क

'जामिया विद्यापीठातील आंदोलनात विद्यार्थी नव्हतेच, राधाकृष्ण विखे पाटलांचा वेगळाच तर्क

Next

मुंबई - नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशातील वातावरण चिघळलं आहे. नॉर्थ इस्ट राज्यांमधून या कायद्याविरुद्ध जनमत तयार झालं आहे. जामिया मिलिया विद्यापीठात आंदोलनला हिंसक वळण मिळालं. या आंदोलनातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. मात्र, या आंदोलनात विद्यार्थी नसून राजकीय पक्षाची भूमिका घेणारे लोकं असल्याचं भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. 

देशभरात सुरू असलेलं आंदोलन हे जनतेचं आंदोलन नसून राजकीय पक्षांचं आहे. जामिया विद्यापीठातलं आंदोलन जे आहे, ते पूर्णत: पॉलिटीकली मोटीव्हेटेड आंदोलन आहे. या आंदोलनास मिळणारा पाठिंबा अतिशय नगण्य आहे. जाळपोळ आणि पोलिसांचा लाठीचार्ज ही मोठी घटना आहे. पण, आंदोलनात राजकीय भूमिका दिसत असून विद्यार्थी हे राजकीय पक्षाच्या चळवळीतील आहेत, असे भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, विखे पाटलांच्या वक्तव्याचा अमित देशमुख यांनी समाचार घेतला असून विखे पाटील यांच वक्तव्यच राजकीय भूमिका दर्शवणारं असल्याचं अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. तर, भाजपा खासदार आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीरनेही पोलिसांच्या लाठीहल्ल्याचा निषेध केला आहे. मात्र, 'अवांछित तत्व' हिंसा करतील, तर पोलिसांकडून प्रत्युत्तर मिळेलच, असेही गंभीरने म्हटले आहे.
 

Web Title: 'Movement of Jamia University involves non-students, its political people', radhakrishana vikhe patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.