पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे आजपासून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:09 AM2021-06-16T04:09:29+5:302021-06-16T04:09:29+5:30

नागपूर : पशुसंवर्धन आयुक्तांची भूमिका संघटनेच्या मागण्यांच्या बाबतीत पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने १५ जूनपासून आंदोलनाचा ...

Movement of Veterinary Practitioners Association from today | पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे आजपासून आंदोलन

पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे आजपासून आंदोलन

Next

नागपूर : पशुसंवर्धन आयुक्तांची भूमिका संघटनेच्या मागण्यांच्या बाबतीत पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने १५ जूनपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. पशुसंवर्धन आयुक्तांसोबत ११ मागण्यांवर चर्चा करण्यासाठी संघटनेने निवेदन दिले होते. मात्र त्यानी कसलीही दखल घेतली नाही. चर्चेसाठी निमंत्रणही दिले नाही. यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ७ जूनला त्यांच्या दालनात जाऊन चर्चा केली. परंतु केवळ दोन मुद्द्यांवर अर्धवट चर्चा सोडून दिल्याचा संघटनेचा आरोप आहे. यामुळे १५ पासून विविध टप्प्यांवर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

आंदोलनकाळात १५ जूनपासून लसीकरण, सर्व प्रकारचे अहवाल देणे बंद करण्याचा तसेच आढावा बैठकांना संवर्गातील सदस्यांनी उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. २५ जूनपासून विधानसभा, विधान परिषद सदस्यांना निवेदन देण्याचा आणि १६ जुलैपासून कायद्याप्रमाणे काम करण्याचा निर्णय झाल्याचे संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. सुनील काटकर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Web Title: Movement of Veterinary Practitioners Association from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.