एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:11 AM2021-03-13T04:11:30+5:302021-03-13T04:11:30+5:30
.... संघ लोकसेवा आयोग, आरोग्य विभाग तसेच अन्य विभागांच्या परीक्षा होत असताना, नेमक्या एमपीएससी परीक्षांसाठी कोरोनाचे कारण काय ? ...
....
संघ लोकसेवा आयोग, आरोग्य विभाग तसेच अन्य विभागांच्या परीक्षा होत असताना, नेमक्या एमपीएससी परीक्षांसाठी कोरोनाचे कारण काय ? यामागे राजकारण असून, मराठा आरक्षणासाठी या तारखा लांबणीवर पडत आहेत. मात्र, यामुळे आम्हा विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याचा विचार करून आयोगाने निर्धारित तारखेला या परीक्षा घ्याव्या.
- योगेश घुघुसकर, सुसेवाडी, ता. रामटेक
...
मागील वर्षीही अगदी एक दिवसांपूर्वी परीक्षा रद्द केली. आता पुन्हा तीन दिवसांपूर्वी असा निर्णय आला आहे. दोन वर्षांपासून आम्हा विद्यार्थ्याचे यामुळे नुकसान होत आहे. अनेकांचे वय वाढत आहे. हा आमच्यावर अन्याय आहे.
- विनित गेडाम, सक्करदरा
...
दीड वर्षांपासून माझी परीक्षेसाठी तयारी सुरू आहे. वाचनालयात जाऊन नियमित अभ्यास सुरू आहे. या परिश्रमाचा आयोगाने विचार करावा. आतापर्यंत चार वेळा परीक्षेने हुलकावणी दिली आहे.
- आदित्य राखडे, मानेवाडा
...
वारंवार परीक्षा रद्द होत असल्याने आमची अभ्यासाची लिंक तुटत आहे. अजून किती वाट पाहायची? मागील तीन वर्षांपासून मी अभ्यास करीत आहे. आमच्या वाढत्या वयाचा सरकारने विचार करावा.
- रवि पाठराबे, इतवारी
...
कोरोनाकाळात सर्व व्यवहार सुरू असताना, आमच्या परीक्षेलाच बंधन असण्याचे कारण नाही. आम्ही खेड्यातून येऊन शिकतो. पालकांचा पैसा खर्च होतो. परीक्षा होणारच नसतील, तर सरकारने तसे जाहीर करावे. आम्ही दुसऱ्या परीक्षेच्या तयारीला लागू.
- सूरज दुधनकर, मौदा
...
वारंवार परीक्षा रद्द करणे हा मूर्खपणा आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेच्या जराही विचार होताना दिसत नाही. ऐन तोंडावर परीक्षा रद्द करणे चुकीचे आहे. परीक्षा वेळेनुसार घ्यायलाच हवी.
- अमित ठाकरे, मन्सर, ता. रामटेक
...