रामटेक येथे मृगधारा कविसंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:07 AM2021-07-16T04:07:20+5:302021-07-16T04:07:20+5:30
रामटेक : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भरत मुनी ललितकला केंद्र आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे (मुंबई प्रदेश) ...
रामटेक : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भरत मुनी ललितकला केंद्र आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे (मुंबई प्रदेश) यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी (दि. १८) राज्यस्तरीय मृगधारा कविसंमेलनाचे आयाेजन केले आहे. हे संमेलन ऑनलाईन पद्धतीने सायंकाळी ४ ते ६ या वेळेत घेण्यात येणार आहे.
कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्राे. श्रीनिवास वरखेडी यांच्या हस्ते कविसंमेलनाचे उद्घाटन केले जणार असून, अध्यक्षपदी हिरकणी पुरस्कारप्राप्त कवयित्री राजश्रीजी बोहरा राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून नामदेव राठोड, कुलसचिव प्रो. सी. जी. विजयकुमार असतील. सूत्रसंचालन गीतांजली वाणी व जान्हवी कुंभारकर करणार असून, या संमेलनात राज्यभरातील कवी आपापल्या कविता सादर करतील. काव्य रसिकांनी या संमेलनाचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य आयोजिका प्रा. ललिता चंद्रात्रे, समन्वयक योगिता गायकवाड यांनी केलेे आहे.