महावितरण आक्रमक : १०,८०० थकबाकीदारांची वीज कापली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 10:16 PM2021-06-30T22:16:49+5:302021-06-30T22:17:31+5:30

MSEDCL aggressive वीज बिलाची थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध महावितरणने कारवाई आणखी तीव्र केली आहे. याअंतर्गत नागपूर झोन व वर्धा जिल्ह्यातील १०,८०० ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्यात आले.

MSEDCL aggressive: 10,800 arrears consumers power cut off | महावितरण आक्रमक : १०,८०० थकबाकीदारांची वीज कापली

महावितरण आक्रमक : १०,८०० थकबाकीदारांची वीज कापली

Next
ठळक मुद्देनागरिकांच्या तक्रारीही वाढल्या

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वीजबिलाची थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध महावितरणने कारवाई आणखी तीव्र केली आहे. याअंतर्गत नागपूर झोन व वर्धा जिल्ह्यातील १०,८०० ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्यात आले. या ग्राहकांवर एकूण ३३१ कोटी रुपयाची थकबाकी आहे. दुसरीकडे महावितरण संदर्भात नागरिकांच्या तक्रारीही वाढल्या आहेत.

जून महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही जिल्ह्यात थकीत वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. अनेक ग्राहकांनी महावितरणच्या आवाहनानुसार थकबाकी भरली. परंतु ज्या ग्राहकांनी पैसे भरले नाहीत. त्यांचे वीज कनेेक्शन कापले जात आहे. या मोहीम अंतर्गत बुधवारी महाल डिव्हीजनमधील ३० थकबाकीदार ग्राहकांची वीज कापण्यात आली. त्यांच्यावर एकूण ३४.६२ लाख रुपयांची थकबाकी होती. दोन थकबाकीदारांनी लगेच १.१७ लाखाचा भरणा केल्याने ते कारवाईपासून वाचले. दुसरीकडे ठक्करग्राम, नाईक तलाव, बंगाली पंजा परिसरात पोलीस बंदोबस्तात ८ ग्राहकांचे कनेक्शन कापण्यात आले. ३ ग्राहकांनी तत्काळ पैसे भरले. मोहिमे दरम्यान २४ ठिकाणी वीज चोरीही पकडण्यात आली. या ग्राहकांवर कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई कार्यकारी अभियंता समीर टेकाडे, उपकार्यकारी अभियंता मुकेश चौधरी, प्रशांत भाजीपाले, सहायक अभियंता प्रशांत इंगळे, अल्पेश चव्हाण, तुषार मेंढे यांनी केली.

पुन्हा हल्ला-शिवीगाळ

वसुली मोहीम दरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर सातत्याने हल्ले होताहेत. शिवीगाळ केली जात आहे. ताजे प्रकरण बेसा वितरण केंद्राअंतर्गत घडले. सहायक अभियंता विनोद नासरे आपल्या सहकाऱ्यांसह अथर्व हेरिटेज येथे थकबाकी वसुलीसाठी गेले. तिथे त्यांनी आतिश पटेल यांच्याकडे गेल्या तीन महिन्याची थकबाकी असलेले साडेसहा हजार रुपयाच्या बिलाची मागणी केली. थकबाकी न भरल्याने कनेक्शन कापले. असा आरोप आहे की, पथकात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत त्यांना मारण्याची धमकी देण्यात आली. दोन कर्मचाऱ्यांचा मोबाईल हिसकावला. महावितरणच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

महावितरण कार्यालयात गर्दी, कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन

वसुली माेहीम सुरु होताच महावितरण कार्यालयात गर्दी वाढली आहे. कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन होत आहे. अभियंत्यांच्या केबिनमध्ये व बाहेरही लोक गर्दी करीत आहेत. सुरक्षित अंतराच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. बहुतांश नागरिक बिलासंदर्भात आक्षेप घेत आहेत. अभियंत्यांना बिल व्यवस्थित करून देण्याची विनंती केली जात आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, अनेक महिन्यांपासून दुकान बंद होते. तरीही बिल आले आहे. तर सर्वसामान्य नागरिक बिल भरण्यासाठी सवलत देण्याची मागणी करीत आहेत.

Web Title: MSEDCL aggressive: 10,800 arrears consumers power cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.