महावितरण : नागपूर जिल्ह्यातील ११ लाख वीज ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 11:14 PM2020-05-14T23:14:49+5:302020-05-14T23:21:24+5:30

महावितरणकडून वीज ग्राहकांना मोबाईल एसएसएस सुविधा नि:शुल्क उपलब्ध करून दिल्याने नागपूर जिल्ह्यातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहक याचा लाभ घेत आहेत. जिल्ह्यातील सुमारे २ लाख वीज ग्राहकांनी अद्यापही महावितरणकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी न केल्याने ते यापासून वंचित राहिले आहेत.

MSEDCL: Information to 11 lakh electricity consumers in Nagpur district through SMS | महावितरण : नागपूर जिल्ह्यातील ११ लाख वीज ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून माहिती

महावितरण : नागपूर जिल्ह्यातील ११ लाख वीज ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देशिल्लक वीज ग्राहकांनी मोबाईल क्रमांक नोंदवावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणकडून वीज ग्राहकांना मोबाईल एसएसएस सुविधा नि:शुल्क उपलब्ध करून दिल्याने नागपूर जिल्ह्यातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहक याचा लाभ घेत आहेत. जिल्ह्यातील सुमारे २ लाख वीज ग्राहकांनी अद्यापही महावितरणकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी न केल्याने ते यापासून वंचित राहिले आहेत. परिणामी महावितरणकडून दिले जाणारे संदेश या वीज ग्राहकापर्यंत पोहचत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या वीज ग्राहकांनी आपली माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर जाऊन अद्ययावत करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नागपूर शहरात ७ लाख ८१ हजार ५९१ वीज ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची माहिती महावितरणकडे दिली असून नागपूर ग्रामीण भागात ३ लाख ६६ हजार ६ ग्राहकांनी आपले मोबाइलला क्रमांक महावितरणला दिले आहेत.
महावितरणकडे वीज ग्राहकाचा मोबाईल क्रमांक नोंदणी असल्यास अकस्मात वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याचे कारण, वीज ग्राहकाच्या घरी मीटर वाचन करण्यास मीटर रीडर कधी आणि किती वाजता येणार याची माहिती, वीज ग्राहकाने विशिष्ट कालावधीत किती युनिटचा वापर केला, किती रुपयांचे देयक भरले आहे याची माहिती एसएमएसच्या माध्यमातून वीज ग्राहकास दिल्या जाते. वीज ग्राहकांनी आपला मोबाईल क्रमांक, आधार कार्ड नंबर आणि ई-मेल नोंदणीसाठीttps://consumerinfo.mahadiscom.in येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वीज ग्राहकांनी आपला वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या १८००२३३३४३५ येथे ,तसेच राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक १९१२ येथे संपर्क साधावा. वरील सर्व क्रमांक टोल फ्री असल्याने यासाठी वीज ग्राहकाला पैसे मोजावे लागत नाहीत. सोबतच महावितरणच्या वीज ग्राहकांसाठी नुकतीच ‘मिस्ड कॉल’ सेवा सु्न६ करण्यात आली आहे. महावितरणकडे नोंदणी असलेल्या मोबाईल क्रमांकावरून वीज ग्राहकाने ०२२- ४१०७८५०० येथे फोन करायचा आहे.

Web Title: MSEDCL: Information to 11 lakh electricity consumers in Nagpur district through SMS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.