महावितरणचा एक गाव-एक दिवस उपक्रम : थेट गावात जाताहेत अभियंते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 11:56 PM2020-07-30T23:56:46+5:302020-07-30T23:58:14+5:30

महावितरणचे अभियंते आता थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणीची कामेही करून देत आहेत. एक गाव-एक दिवस या महावितरणच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला असून नागपूर जिल्ह्यात ३४ गावांमध्ये ९५८ कामे करण्यात आली आहेत.

MSEDCL One Village One Day Initiative: Engineers go directly to the village | महावितरणचा एक गाव-एक दिवस उपक्रम : थेट गावात जाताहेत अभियंते

महावितरणचा एक गाव-एक दिवस उपक्रम : थेट गावात जाताहेत अभियंते

googlenewsNext
ठळक मुद्दे३४ गावांमध्ये ९५८ कामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: महावितरणचे अभियंते आता थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणीची कामेही करून देत आहेत. एक गाव-एक दिवस या महावितरणच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला असून नागपूर जिल्ह्यात ३४ गावांमध्ये ९५८ कामे करण्यात आली आहेत.
नागपूर परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नागपूर जिल्ह्यात ही मोहीम सुरु केल्यावर आतापर्यंत वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची ३०८ कामे, वीजबिल व वीजमीटर संदर्भातील ६५० तक्रारींच्या निवारणचा समावेश आहे.
महावितरणकडून करण्यात येणाऱ्या कामामध्ये तारांमधील झोल काढणे, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सूलेटर बदलणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रीब्युशन बॉक्सची स्वच्छता व आवश्यक दुरुस्ती, किटकॅट बदलणे, गांजलेले वीजखांब बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, नादुरुस्त व धोकादायक सर्व्हिस वायर्स बदलणे आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती, वीजमीटरची तपासणी, नावात बदल, वीजदेयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे, मीटर घराबाहेर काढणे अशा प्रकारची कामे करण्यात येत आहेत.

Web Title: MSEDCL One Village One Day Initiative: Engineers go directly to the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.