महावितरण कंपनीचा वीज ग्राहक मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:10 AM2021-02-27T04:10:45+5:302021-02-27T04:10:45+5:30
गाेंडखैरी : स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात महावितरण कंपनीने वीज ग्राहकांच्या मेळाव्याचे आयाेजन केले हाेते. त्यात सहभागी झालेल्या ३९ ग्राहकांनी ...
गाेंडखैरी : स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात महावितरण कंपनीने वीज ग्राहकांच्या मेळाव्याचे आयाेजन केले हाेते. त्यात सहभागी झालेल्या ३९ ग्राहकांनी त्यांच्याकडे थकीत असलेल्या ४ लाख २५ हजार रुपयांचा भरणा केला. ग्राहकांना राज्य शासनाचे वीज धाेरण, कृषी धाेरण, कृषीपंपाच्या थकीत बिलांवर लादलेले व्याज, विलंब आकार व माफीची याेजना याबाबत माहिती देण्यात आली.
थकीत बिलांमध्ये ५० टक्के सूट दिली जाणार असून, केवळ ५० टक्के वीज बिल शेतकऱ्यांना भरायचे आहे. शेतकऱ्यांनी वीज बिल भरावे, असे आवाहन गोंडखैरी वितरण केंद्रांचे साहाय्यक अभियंता राहुल लांजेवार यांनी केले. राज्य शासनाने कृषी धाेरण २०२० जाहीर केले आहे. या धाेरणाअंतर्गत कृषी वीज बिलाच्या थकबाकीवर विविध सवलती जाहीर केल्या आहेत. या सवलतींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, या उद्देशाने या मेळाव्याचे आयाेजन केल्याचे कार्यकारी अभियंता पुंडलिक भस्मे यांनी सांगितले. मेळाव्याचे उद्घाटन सरपंच चांगदेव कुबडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता पंकज होनाडे, अभियंता राहुल लांजेवार, उपसरपंच मोहन झोडापे, तंत्रज्ञ उमाकांत मून, नीलेश अतकरी, मेश्राम, कल्याणी राऊत, वैभव खंडागळे, अशोक झोडे, मिलींद नागदिवे, महेंद्र, अक्षय केटे, विलास मोहर्ले उपस्थित होते.