महावितरणच्या जनमित्रास वीज चोराची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:06 AM2021-07-18T04:06:47+5:302021-07-18T04:06:47+5:30

नागपूर : वापरलेल्या विजेचे देयकापोटी असलेली रक्कम न भरल्याने महावितरणकडून वीज पुरवठा खंडित केला. काही काळानंतर आकडा टाकून अवैधपणे ...

MSEDCL's Janmitras beaten by power thief | महावितरणच्या जनमित्रास वीज चोराची मारहाण

महावितरणच्या जनमित्रास वीज चोराची मारहाण

Next

नागपूर : वापरलेल्या विजेचे देयकापोटी असलेली रक्कम न भरल्याने महावितरणकडून वीज पुरवठा खंडित केला. काही काळानंतर आकडा टाकून अवैधपणे वीज पुरवठा सुरू केला असता त्यास महावितरणच्या जनमित्राने प्रतिबंध केला असता त्याला मारहाण करणाऱ्या ग्राहकाच्या विरोधात शनिवारी लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, महावितरणचे जनमित्र जगदीश डकाह हे आपल्या शाखा अभियंता यांच्या आदेशानुसार १६ जुलै रोजी नेहरू पुतळा, मिर्ची बाजार परिसरात थकबाकीदार ग्राहकाकडून वीज देयकाची वसुली करीत होते. तेलीपुरा परिसरात ससुनिसा अब्दुल हमीद या वीज ग्राहकाची जोडणी थकबाकीमुळे काही दिवसापूर्वी डकाह यांनी खंडित केली होती. थकबाकीची रक्कम न भरता वीज ग्राहकाने थेट आकडा टाकून वीज पुरवठा सुरू केला होता. ही बाब डकाह यांच्या निदर्शनास आली असता त्यांनी वीज वाहिनीवर पुन्हा टाकलेला आकडा काढून टाकला. वीज पुरवठा खंडित करून पोलवरून खाली उतरले असता मोहम्मद इजाज अब्दुल हमीद या व्यक्तीने जगदीश डकाह यांना शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी लकडगंज पोलिसात डकाह यांनी तक्रार केली असता आरोपी मोहम्मद इजाज अब्दुल हमीद याच्या विरोधात भादंवि कलम ३५३, ५०४ आणि वीज कायदा-२००३ कलम १३८ नुसार गुन्हा दाखल केला. घटनेनंतर आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Web Title: MSEDCL's Janmitras beaten by power thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.