नागपूर डीबीएची बहुप्रतीक्षित निवडणूक आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 01:08 AM2018-10-26T01:08:32+5:302018-10-26T01:10:16+5:30
जिल्हा विधिज्ञ संघटनेची (डीबीए) बहुप्रतीक्षित निवडणूक शुक्रवारी होणार असून कार्यकारी मंडळातील १७ जागांसाठी तब्बल ६८ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीत मतदान करण्याकरिता ३९०५ वकील पात्र ठरले आहेत. वकिलांमध्ये निवडणुकीचा उत्साह आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा विधिज्ञ संघटनेची (डीबीए) बहुप्रतीक्षित निवडणूक शुक्रवारी होणार असून कार्यकारी मंडळातील १७ जागांसाठी तब्बल ६८ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीत मतदान करण्याकरिता ३९०५ वकील पात्र ठरले आहेत. वकिलांमध्ये निवडणुकीचा उत्साह आहे.
नवनिर्वाचित कार्यकारी मंडळ दोन वर्षे म्हणजे, २०१८ ते २०२० पर्यंत कार्यरत राहील. जिल्हा न्यायालयातील विविध खोल्यांमध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानासाठी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजतापर्यंतचा वेळ निर्धारित करण्यात आला आहे. निवडणूक समितीने आचारसंहिता जाहीर केली असून त्याचे उल्लंघन करणाऱ्या वकिलांवर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. २७ आॅक्टोबर रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.
असे आहेत उमेदवार
अध्यक्ष - उदय डबले, मनोज साबळे, कमल सतुजा.
महासचिव - रंजन देशपांडे, नितीन देशमुख, सुशील कल्याणी, विवेक कोलते, मंगेश मून.
उपाध्यक्ष (दोन जागा) - पराग बेझलवार, प्रभाकर भुरे, शशांक चौबे, मनीष गुप्ता, विवेक कराडे, सुनील लाचरवार, सौमित्र पाल, विलास राऊत, विलास सेलोकर, तावीर शेख, छायादेवी यादव.
ग्रंथालय प्रभारी - कीर्तिकुमार कडू, शरद पनपालिया, नीतेश समुंद्रे, विक्की तांबे, मंगला वरके.
सहसचिव (दोन जागा) - मो. सज्जथ बेग, आशिष भेंडारकर, शैलेश जयस्वाल, मीनाक्षी माहेश्वरी, शीतल शुक्ला, उमाकांत सोनकुसरे, पंकज तपासे, पराग वाघ, कैलाश वाघमारे.
कोषाध्यक्ष - नितीन गांधी, अनिल गुल्हाने, तरुण परमार, सागरिका पाठक़
कार्यकारी सदस्य (नऊ जागा) - अश्विन बेठारिया, धर्मराज बोगाटी, रोहित बोरवणकर, पवन गभणे, सी.एम. गायधने, देवेंद्र गलांडे, रेखा गोडबोले, सूरज गुप्ता, चंद्रशेखर जनबंधू, साहिल कश्यप, शबाना खान, विनोद खोबरे, महेश मुरुगन, आशिष नायक, वैभव ओगले, दीपाली पद्मगिरवार, रमेश पटले, इम्रान पठाण, प्रीती पिंपळकर, हर्षद पुराणिक, सौरभ राऊत, विलास सरदार, सोहेल शेख, पारुल शेंद्रे, हेमलता सिंग, रुबी सिंग, नीलेश ठेंगरे, धिरेंद्र उपाध्याय.