म्यूकोरमायकोसिस: कोरोना संक्रमणानंतरचे मोठे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:08 AM2021-05-09T04:08:30+5:302021-05-09T04:08:30+5:30
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये हे सामान्य आहे काय? जगात मधुमेहाची राजधानी म्हणून कुप्रसिद्ध असलेला भारत दुर्दैवाने म्यूकोरमायकोसिसच्या प्रकरणातही जगात ...
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये हे सामान्य आहे काय?
जगात मधुमेहाची राजधानी म्हणून कुप्रसिद्ध असलेला भारत दुर्दैवाने म्यूकोरमायकोसिसच्या प्रकरणातही जगात सर्वात पुढे आहे. याचा थेट संबंध कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमधील अनियंत्रित डायबिटीजशी आहे. यास ब्लॅक फंगस नावानेही ओळखले जाते, जो कमजोर रोगप्रतिकार क्षमता असलेल्या लोकांमध्ये राहण्याची शक्यता अधिक आहे. रक्तात असलेला ग्लुकोज हेच ब्लॅक फंगसचे आहार असते.
म्यूकोरमायकोसिस होण्याचा धोका कुणाला अधिक?
कोरोनातून बरे होत असलेले रुग्ण ज्यांच्या रक्तात ग्लुकोजचे प्रमाण अधिक असते. अधिक ब्लड ग्लुकोजचे कारण अनियंत्रित डायबिटीज किंवा डायबिटीजचा अस्तरीय उपचारही असू शकतो. स्टेरॉईडचे कारण म्यूकोरमायकोसिस होण्याचा धोका वाढतो. अधिक काळासाठी स्टेरॉईडचे हेवी डोस घेणाऱ्यांमध्येही म्यूकोरमायकोसिसचा धोका अधिक असतो. स्टेरॉईडसुद्धा रोगप्रतिकारक्षमता प्रभावित करण्यास कारणीभूत असतो.
म्यूकोरमायकोसिससाठी जबाबदार कारक?
म्यूकोरमायकोसिसच्या सर्व रुग्णांमध्ये कोणती तरी धोकादायक मेडिकल परिस्थिती असते, जी संक्रमणाचे पूर्व अनुमान लावण्याची सूचक असते. यामध्ये किटोएसिडोसिस सोबत डायबिटीज, स्टेरॉईडद्वारे उपचार, रक्तदोष, एखाद्या अंगाचे प्रत्यारोपण, एड्स, डेफेरोक्जेमिनसह उपचार, जास्त आयरन, अनेक आघातांमधून गेलेले, एखाद्या अपघातात जळालेले किंवा कुपोषित व्यक्तीवरही या आजाराचा धोका अधिक असतो.
म्यूकोरमायकोसिसची प्रमुख लक्षणे?
डोळ्याच्या आसपास दुखणे, डोक्याच्या समोरच्या भागात दुखणे, चेहरा व विशेषत्वाने गालावर दुखणे आणि अनेकदा नाकातून काळा स्राव, चेहऱ्यावर लालसरपणा व सूज येणे ही सामान्य लक्षणे आहेत. यासह ताप येणे, उलट्या होणे, धुसर दिसणे किंवा अंधत्वासारखे परिणामही दिसून येतात. चेहरा व डोक्याचे सायनस सुजण्याची शक्यता व दुखणेही असू शकते. अनेकदा टाळू बेरंग होण्याची शक्यता आहे.
ब्लॅक फंगस इन्फेक्शन कसा होतो?
या फंगसचे बीज (स्पोर्स) श्वसनावाटे शरीराच्या आतमध्ये जातात. हे स्पाेर्स नाकपुड्या व सायनसमध्ये थांबतात. त्यांच्या संख्येत वेगाने वाढ हाेते. ते आसपासची दाढ आणि नरम उतकांना नुकसान पाेहचवितात. काहीच दिवसात ते डाेळे आणि मेंदूच्या आतमध्ये घर तयार करतात. हे स्पाेर्स दमट हवा किंवा दुर्गंधीयुक्त परिसरात राहतात. रक्तात अधिक प्रमाणात ग्लुकाेज आणि स्टेराॅईडच्या अनियंत्रित वापरामुळे या फंगसचे पसरणे आणि त्यांच्या संख्येत वेगाने वाढ हाेण्यास कारणीभूत ठरते. काेराेना विषाणूपासून वाचलेल्या लाेकांमध्ये हाेणाऱ्या पॅटर्नला रिनो-ऑर्बिटल-सेरेब्रल म्यूकोरमायकोसिस असे संबाेधले जाते.