हुडकेश्वर-नरसाळावर मनपाची कृपा

By admin | Published: January 13, 2015 01:01 AM2015-01-13T01:01:55+5:302015-01-13T01:01:55+5:30

शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी निधी नसल्याचे रडगाणे महापालिका सातत्याने गात आहे. मात्र, दुसरीकडे महापालिकेत नव्याने सामील करण्यात आलेल्या हुडकेश्वर-नरसाळा

Mudacha grace on Hudkeshwar-Narsa | हुडकेश्वर-नरसाळावर मनपाची कृपा

हुडकेश्वर-नरसाळावर मनपाची कृपा

Next

रस्त्यांचे १० प्रस्ताव मंजूर : शहरातील रस्त्यांना मात्र कात्री
नागपूर : शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी निधी नसल्याचे रडगाणे महापालिका सातत्याने गात आहे. मात्र, दुसरीकडे महापालिकेत नव्याने सामील करण्यात आलेल्या हुडकेश्वर-नरसाळा परिसरातील रस्त्यांसाठी महापालिकेने आपली तिजोरी उघडल्याचे दिसत आहे. सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत रस्त्यांचे ४० प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यातील १० प्रस्ताव हुडकेश्वर-नरसाळा याचे आहेत. आपल्या प्रभागातील रस्त्यांसाठी निधी मिळत नाही अन् दुसरीकडे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघात येणाऱ्या या भागाकडे महापालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले असल्याची चर्चा नगरसेवकांमध्ये रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
हुडकेश्वर-नरसाळा या परिसराचा महापालिकेच्या हद्दीत समावेश करताना या भागाच्या विकासासाठी विशेष पॅकेज दिले जाईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती.

Web Title: Mudacha grace on Hudkeshwar-Narsa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.