काँग्रेसमध्ये मुळक यांना सर्वाधिक मते

By Admin | Published: October 26, 2014 12:13 AM2014-10-26T00:13:30+5:302014-10-26T00:13:30+5:30

कामठी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र मुळक हे निवडणूक रिंगणात होते. त्यांचा भाजपच्या उमेदवाराने पराभव केला. असे असले तरी पराभूत उमेदवारांमध्ये राज्यातून चौथ्या

Mulak has the most votes in Congress | काँग्रेसमध्ये मुळक यांना सर्वाधिक मते

काँग्रेसमध्ये मुळक यांना सर्वाधिक मते

googlenewsNext

विदर्भात प्रथम : पराभूत उमेदवारांमध्ये राज्यात चौथ्या क्रमांकावर
नागपूर : कामठी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र मुळक हे निवडणूक रिंगणात होते. त्यांचा भाजपच्या उमेदवाराने पराभव केला. असे असले तरी पराभूत उमेदवारांमध्ये राज्यातून चौथ्या क्रमांकाची मते त्यांना मिळाली. विदर्भातून काँग्रेसच्या विजयी आणि पराभूत उमेदवारांना मिळालेल्या मतांचा विचार करता राजेंद्र मुळक हे अव्वलस्थानी असून त्यांना ८६,७५३ मते मिळाली.
विदर्भातून काँग्रेस पक्षाचे १० उमेदवार विजयी झाले. त्यामध्ये विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार, रणजित कांबळे, अमर काळे, हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, अमित झनक, वीरेंद्र जगताप, गोपाल अग्रवाल यांचा समावेश आहे. तर शिवाजीराव मोघे, नितीन राऊत, वसंत पुरके, राजेंद्र मुळक, सतीश चतुर्वेदी, सुबोध मोहिते, अनिस अहमद, दिलीप सानंदा, रावसाहेब शेखावत, केवलराम काळे, रामरतन राऊत, आनंदराव गेडाम, सुभाष धोटे, विजय खडसे, सुभाष कोरपे, अविनाश वारजूरकर, वामनराव कासावार, विकास ठाकरे, अनिरुद्ध देशमुख, राहुल ठाकरे, नरेशचंद्र ठाकरे, शेखर शेंडे हे पराभूत झाले.
राज्यातील काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांचा विचार करता सर्वाधिक मते करवीर मतदारसंघातून पी. एन. पाटील यांनी १,६०,२८८ घेतले. सतेज पाटील (कोल्हापूर दक्षिण) ९६,९६१, हर्षवर्धन पाटील (इंदापूर) ९४,२२७ आणि चौथ्या क्रमांकाची ८६,७५३ मते कामठीतून राजेंद्र मुळक यांनी घेतली. विदर्भातील काँग्रेसच्या इतर उमेदवारांपैकी सुनील केदार यांनी ८४,६३०, अमर काळे यांनी ७५,८८६, अमित झनक यांनी ७०,९३९ मते घेतली.
राजेंद्र मुळक हे पश्चिम नागपूर मतदारसंघातून इच्छुक होते. परंतु, अखरेच्या क्षणी कामठी मतदारसंघातून ते निवडणूक रिंगणात उतरले. केवळ १३ दिवसांच्या कालावधीत त्यांनी ८६ हजारांवर मते घेतली. ते पराभूत झाले असले तरी काँग्रेसमध्ये अव्वल ठरले आहेत. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातही मुळक ‘टॉप’
विधानसभा निवडणुकीत नागपूर जिल्ह्यातील १२ मतदारसंघाचा विचार करता राजेंद्र मुळक हेच ‘टॉप’ची मते घेणारे काँग्रेसचे उमेदवार ठरले.
राजेंद्र मुळक यांनी ८६,७५३ मते पहिल्या क्रमांकावर राहण्याचा मान मिळविला. दुसऱ्या क्रमांकावर ८६,६३० मते घेत सुनील केदार (सावनेर) हे राहिले. ६०,०९८ मते घेत विकास ठाकरे (पश्चिम) हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. नागपूर शहरातील काँग्रेस उमेदवारांचा विचार करता विकास ठाकरे यांनी पहिल्या क्रमांकाची मते घेतली. जिल्ह्यात चवथ्या क्रमांकावर प्रफुल्ल गुडधे (५४,९७५), पाचव्या क्रमांकावर अभिजित वंजारी (५०,५२२), सहाव्या क्रमांकावर डॉ. नितीन राऊत (५०,४०२), सातव्या क्रमांकावर अनिस अहमद (४९,४५२), आठव्या क्रमांकावर सतीश चतुर्वेदी, नवव्या क्रमांकावर सुबोध मोहिते (३५,५४६), दहाव्या क्रमांकावर कुंदा राऊत (२०,५७३), अकराव्या क्रमांकावर संजय मेश्राम (१७,५६८) तर बाराव्या क्रमांकावर दिनेश ठाकरे (४,७७८) हे राहिले.

Web Title: Mulak has the most votes in Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.