गुरुवारपासून मुंबई नागपूर वन-वे सुपरफास्ट
By नरेश डोंगरे | Published: April 30, 2024 08:08 PM2024-04-30T20:08:37+5:302024-04-30T20:08:45+5:30
एकेरी विशेष रेल्वेगाडी
नागपूर: मुंबई - नागपूर मार्गावरील प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता या मार्गावर सुपरफास्ट वन-वे स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. गुरुवार, २ मे पासून ही गाडी प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. एकेरी विशेष रेल्वेगाडी
मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २ मे पासून ही स्पेशल ट्रेन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री १२.२० वाजता सुटेल आणि १५ तासानंतर दुपारी ३.३२ वाजता नागपूर स्थानकात दाखल होईल. दरम्यान, सीएसएमटीतून सुटल्यानंतर ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. अर्थात यास्थानकावरून प्रवासी या गाडीतून चढू वा उतरू शकणार आहेत.
गाडीला दोन वातानुकूलित द्वितीय, सहा वातानुकूलित तृतीय, तीन वातानुकूलित तृतीय, आठ शयनयान आणि सहा सामान्य द्वितीय श्रेणीचे कोच तसेच दोन गार्ड ब्रेक व्हॅन राहणार आहे. १ मे पासून या गाडीचे आरक्षण कोणत्याही संगणकीकृत आरक्षण केंद्रांवरून करण्यात येणार आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.