'मम्मी-पापा यू टू' अभियान : आई-बाबा लागा तुम्ही स्वच्छतेच्या कामाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:54 PM2020-01-13T23:54:09+5:302020-01-13T23:55:04+5:30

‘आई-बाबा सांगत्ये मी तुम्हाला, लागा तुम्ही नागपूर स्वच्छतेच्या कामाला’ अशा एकापेक्षा एक घोषवाक्याची निर्मिती नागपूर शहरातील विद्यार्थ्यांनी करून आपल्यातील कल्पकतेचा आणि जागरूकतेचा परिचय दिला.

Mummy-Papa You Too Campaign: Parents do for work! | 'मम्मी-पापा यू टू' अभियान : आई-बाबा लागा तुम्ही स्वच्छतेच्या कामाला!

'मम्मी-पापा यू टू' अभियान : आई-बाबा लागा तुम्ही स्वच्छतेच्या कामाला!

googlenewsNext
ठळक मुद्दे१ लाख १५ हजार विद्यार्थ्यांचा घोषवाक्य स्पर्धेत सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कदम कदम से कदम और हाथ में हाथ मिलाना है, नागपुर को सबसे श्रेष्ठ और सुंदर बनाना है’, ‘उरलेले अन्न जमा करीन डब्यात, कचऱ्याची गाडी आली टाकीन हिरव्या डब्यात’, ‘आई-बाबा सांगत्ये मी तुम्हाला, लागा तुम्ही नागपूर स्वच्छतेच्या कामाला’ अशा एकापेक्षा एक घोषवाक्याची निर्मिती नागपूर शहरातील विद्यार्थ्यांनी करून आपल्यातील कल्पकतेचा आणि जागरूकतेचा परिचय दिला.
निमित्त होते महापालिका, शालेय शिक्षण विभाग आणि पोलीस वाहतूक विभागाच्या वतीने आयोजित ‘मम्मी पापा यू टू’ अभियानाचे. १३ ते १९ जानेवारीदरम्यान राबविण्यात येत असलेल्या अभियानाच्या पहिल्या दिवशी सोमवारी नागपूर शहरातील विद्यार्थ्यांसाठी घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये शहरातील मनपा शाळांसह एकूण ९२६ शाळांतील १ लाख १५ हजार ५३६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत एकापेक्षा एक सरस घोषवाक्यांची निर्मिती केली. हीच घोषवाक्ये घेऊन शहरातील सर्व शाळांतील विद्यार्थी १७ जानेवारीला सकाळी ८.३० वाजता मानवी साखळी तयार करणार आहे. स्वच्छता आणि वाहतूक नियम पाळण्यासंदर्भात जनजागृती करणार आहेत.
सोमवारी घोषवाक्य स्पर्धा शाळास्तरावर दोन गटात घेण्यात आली. यामध्ये ५ ते ८ एक गट आणि ९ ते १२ वी दुसºया गटाचा समावेश आहे. या स्पर्धेतून प्रत्येक शाळेतील एक उत्कृष्ट घोषवाक्य निवडण्यात येईल. यानंतर ३० केंद्रांवरून केंद्रस्तरावर प्रत्येकी एका केंद्रातून एक असे ३० घोषवाक्य निवडण्यात येतील. त्यातून उत्कृष्ट ३ आणि १० उत्तेजनार्थ बक्षिसासाठी घोषवाक्यांची निवड महापालिकास्तरावर केली जाईल.
घोषवाक्य स्पर्धेसाठी प्रथम ११ हजार रुपये, द्वितीय पाच हजार रुपये तर तृतीय तीन हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. प्रत्येकी एक हजार रुपयांचे दहा उत्तेजनार्थ पारितोषिकही देण्यात येईल. सोमवारी पार पडलेल्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांत उत्साह होता.

महापौर, आयुक्तांनी केले कौतुक
एखाद्या चांगल्या उद्देशासाठी नागपूर शहरातील सर्वच शाळांतील विद्यार्थ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘मम्मी पापा यू टू’ अभियानाच्या निमित्ताने मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी पहिल्याच स्पर्धेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल महापौर संदीप जोशी आणि आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्वांचे अभिनंदन करीत कौतुक केले आहे.

आज पथनाट्य स्पर्धा
मम्मी पापा यू टू अभियानांतर्गत आज मंगळवारी पथनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा प्रथम शाळास्तरावर होईल. यातून के’द्रस्तरावर उत्कृष्ट पथनाट्यांची निवड करून पाठविण्यात येईल. त्यातून उत्कृष्ट पथनाट्यांची निवड शाळास्तरावर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी दिली.

Web Title: Mummy-Papa You Too Campaign: Parents do for work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.