मुनगंटीवार आता नाराज नाहीत, गेली अनेक दशके एकत्र काम केले: गिरीश महाजन
By मंगेश व्यवहारे | Updated: December 21, 2024 12:36 IST2024-12-21T12:35:11+5:302024-12-21T12:36:53+5:30
मंत्रिमंडळ विस्तारात खाते मिळाले नाही म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार आता नाराज नाहीत. मुनगंटीवार आणि मी गेली अनेक दशके एकत्र काम केले आहे.

मुनगंटीवार आता नाराज नाहीत, गेली अनेक दशके एकत्र काम केले: गिरीश महाजन
मंगेश व्यवहारे
नागपूर : मंत्रिमंडळ विस्तारात खाते मिळाले नाही म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार आता नाराज नाहीत. मुनगंटीवार आणि मी गेली अनेक दशके एकत्र काम केले आहे. त्यांना खाते मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु, ते आता रागावलेले नाहीत, असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.
शिवसेना उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना गिरीश महाजन म्हणाले,‘उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये भाजपने विश्वासघात केल्याचा आरोप केला. त्यांनी आमच्याशी सर्व नाती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे राजकीय अस्तित्वच आता अस्थिर आहे. काँग्रेससोबत हातमिळवणी करून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली असून शिवसेनेच्या मूळ मूल्यांपासून ते खूप दूर गेले आहेत.’ खातेवाटपावर बोलताना ते म्हणाले,‘खातेवाटपाच्या प्रक्रियेचा शेवटचा टप्पा सुरू आहे. दोन दिवसांत घोषणा करण्यात येईल.’