मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.  रस्त्यावर, नागरिकांची घेतली झडती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 09:46 PM2021-03-15T21:46:57+5:302021-03-15T21:49:31+5:30

Radhakrishnan b. On the streets वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने १५ ते २१ मार्चदरम्यान कडक निर्बंध लावले आहेत. त्या अनुषंगाने आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी शहरातील रस्त्यांवर उतरून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची झाडाझडती घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी व पोलीस अधिकारी सोबत होते.

Municipal Commissioner Radhakrishnan b. On the streets | मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.  रस्त्यावर, नागरिकांची घेतली झडती 

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.  रस्त्यावर, नागरिकांची घेतली झडती 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने १५ ते २१ मार्चदरम्यान कडक निर्बंध लावले आहेत. त्या अनुषंगाने आयुक्तराधाकृष्णन बी. यांनी सोमवारी शहरातील रस्त्यांवर उतरून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची झाडाझडती घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी व पोलीस अधिकारी सोबत होते.

 वाढत्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बंधने कडक करतानाच नागरिकांनी कामाशिवाय रस्त्यावर फिरू नये, अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावे, असे स्पष्ट आदेश मनपा प्रशासनाने जारी केले आहेत. असे असतानाही रस्त्यावर बऱ्याच प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी वाहने दिसून आली. यामुळे मनपा आयुक्तांनी स्वत: गाडीतून उतरून अनेक वाहनांना थांबविले आणि चौकशी केली. अत्यावश्यक कामाने निघाल्याचे कारण सांगितलेल्या व्यक्तींना कागदपत्रे अथवा संबंधित पुराव्याची मागणी केली. असमाधानकारक उत्तरे देणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी पोलिसांना दिले.

आदेशाचे पालन करा

कोरोना संक्रमण विचारात घेता प्रशासनाने नागरिकांच्या हितासाठी निर्बंध लावण्याचे आदेश दिले आहेत. त्याचे व कोरोनासंदर्भात असलेल्या दिशानिर्देशांचे नागरिकांनी पालन करावे.

-राधाकृष्णन बी. , मनपा आयुक्त

Web Title: Municipal Commissioner Radhakrishnan b. On the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.