मनपा आयुक्तांचा ‘गतिमान’ दिवस

By admin | Published: January 8, 2015 01:23 AM2015-01-08T01:23:48+5:302015-01-08T01:23:48+5:30

पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा पहिला दिवस कार्यक्रम व भेटीगाठीत गेला. मात्र दुसऱ्या दिवशी बुधवारी ते कामाला लागले. सकाळपासून विभागवार आढावा घेऊ न त्यांनी

Municipal Commissioner's 'dynamic' day | मनपा आयुक्तांचा ‘गतिमान’ दिवस

मनपा आयुक्तांचा ‘गतिमान’ दिवस

Next

पहिला दिवस : विभागाचा आढावा, गतिमान प्रशासनासाठी दिले वेळापत्रक
नागपूर : पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा पहिला दिवस कार्यक्रम व भेटीगाठीत गेला. मात्र दुसऱ्या दिवशी बुधवारी ते कामाला लागले. सकाळपासून विभागवार आढावा घेऊ न त्यांनी माहिती जाणून घेतली. शहर विकास आराखड्यावर चर्चा केली; सोबतच मनपाच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेतला. सायंकाळपर्यंत बैठकांचे सत्र सुरू होते.
नागरी सुविधा व गतिमान प्रशासनात विभागप्रमुखांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांनी विभागप्रमुखांना कामाचा प्राधान्यक्रम ठरवून वेळापत्रक तयार करण्याचे निर्देश दिले. कोणतेही काम सुलभतेने व कर्तव्यभावनेतून करा, प्रलंबित काम तातडीने मार्गी लावा, कामाची गती वाढवा. शहरातील विकास कामासोबतच सर्वसामान्यांच्या समस्या मार्गी लावा, अशा स्वरूपाच्या सूचना केल्या. महापालिकेचा कारभार मुख्यालयातून चालतो. पण झोन कार्यालयांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. ही बाब विचारात घेता ते शहरातील सर्व झोन कार्यालयांना भेटी देऊ न आढावा घेणार आहेत.
आयुक्त कामाला लागल्याने मनपातील अधिकाऱ्यांची लगबग वाढली आहे. निर्धारित वेळापत्रकातून रखडलेल्या कामांची माहिती मिळणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनाही काम करावे लागेल. यासाठी त्यांनी विभागप्रमुखांच्या परिचयासोबतच सर्व विभागाचा बैठकीत आढावा घेतला. पदभार स्वीकारताच नागपूर शहराला विकासाचे मॉडेल बनविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांना तसे नियोजन करावे लागणार आहे. याची प्रचिती दुसऱ्या दिवशीच्या बैठकीतून आली. यावेळी उपायुक्त आर.झेड.सिद्दीकी, संजय काकडे, प्रमोद भुसारी, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, निगम सचिव हरीश दुबे, अधीक्षक अभियंता प्रकाश उराडे, आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर, सहायक संचालक सतीश रेंगे, उपसंचालक अ.अ.कुंभोजकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मदन गाडगे, शहर अभियंता संजय गायकवाड, अधीक्षक अभियंता शशिकांत हस्तक, दिलीप जामगडे, कार्यकारी अभियंता अजीज उर रहमान, विकास अभियंता राहुल वारके, कार्यकारी अभियंता महेश गुप्ता, एम.एच. तालेवार, एस.बी. जैस्वाल, श्याम चव्हाण यांच्यासह विभागप्रमुख, दहा झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Municipal Commissioner's 'dynamic' day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.