आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडण्याला मनपा व एमटीडीसी जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:07 AM2021-06-11T04:07:45+5:302021-06-11T04:07:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अंबाझरी तलावाजवळ निसर्गरम्य ठिकाणी तत्कालीन रिपाइं पुढाऱ्यांच्या प्रयत्नातून व विकासक संस्थेच्या माध्यमातून डॉ. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंबाझरी तलावाजवळ निसर्गरम्य ठिकाणी तत्कालीन रिपाइं पुढाऱ्यांच्या प्रयत्नातून व विकासक संस्थेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे निर्माण करण्यात आले. धार्मिक, सामजिक, राजकीय वारसा असलेल्या या भवनाचे नुतनीकरण करण्याची मागणी असतांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने भवन पाडले. याला महापालिका व महामंडळ जबाबदार आहे. यातील दोषीवर कारवाई करावी व भवन पुन्हा उभारण्यात यावे, यासाठी गुरुवारी रिपाई (आठवले) च्या कार्यकर्त्यांनी महामंडळाच्या कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन केले.
डॉ. आंबेडकर भवन पाडणाऱ्यावर गुन्हा दाखल करा, मनपाने केलेला करार रद्द करावा, त्याच जागेवर आंबेडकर भवनाचे त्वरित निर्मिती कार्य सुरू करावे, अशी मागणी पक्षाचे शहराध्यक्ष बाळु घरडे, हरीश लांजेवार,राजू फुलके, अनिल मेश्राम, अनिल गजभिये, अमन मेश्राम, निखील कांबळे, मनोज डांगे, अमोल लोखंडे, सक्षम घरडे आदींनी केली आहे.