अधिकाऱ्यांना महापालिकेचा दणका
By admin | Published: March 28, 2017 01:41 AM2017-03-28T01:41:21+5:302017-03-28T01:41:21+5:30
महापालिके चे आर्थिक नुकसान करणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांवर सहसा कारवाई होत नाही.
तीन अधिकाऱ्यांकडून होणार वसुली मनपाचे स्केंिटंग कंत्राटात नुकसान सात महिन्यांपासून फाईल अधिकाऱ्यांक डे
नागपूर : महापालिके चे आर्थिक नुकसान करणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांवर सहसा कारवाई होत नाही. परंतु स्के टिंग रिंक प्रकरणात आर्थिक नुकसान होण्याला जबाबदार असलेल्या महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांच्या वेतनातून नुकसान भरपाई वसूल करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहे. यामुळे महापालिका अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
नंदनवन येथील गणेशनगर येथे ५० लाखांचा निधी खर्च करून २०११ मध्ये उभारण्यात आलेले स्के टिंग रिंक कमी रकमेची निविदा असलेल्या कंत्राटदाराला देण्यात आली आहे. यात शिक्षणाधिकारी फारुख शेख, क्रीडा अधिकारी विजय इमाने व सहायक अभियंता राहुल गायकी दोषी आढळून आल्याने त्यांच्या वेतनातून ३२ हजार ६६६ रुपयांची वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनातून नुकसान भरपाई करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला देण्यात आल्याची माहिती अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी दिली. त्यानुसार मार्च महिन्याच्या वेतनातून प्रत्येकी १० हजारांची कपात केली जाणार आहे. नंदनवन येथील गणेशनगर येथे ५० लाखांचा निधी खर्च करून २०११ मध्ये उभारण्यात आलेले स्के टिंग रिंक कमी रकमेची निविदा असलेल्या कंत्राटदाराला देण्यात आली आहे.
२०११ मध्ये स्केटिंग रिंकचे निर्माण केल्यानंतर सुरुवातीला प्रतिमाह १६ हजार रुपये भाड्याचा कंत्राट देण्यात आला होता.
२०१६ मध्ये महापालिकेने पुन्हा निविदा काढल्या. तीन कंत्राटदारांना निविदा सादर केल्या होत्या. परंतु यातील सर्वात कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली.(प्रतिनिधी)