मनपा : महापौर तिवारी व उपमहापौर धावडे यांनी पदभार स्वीकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 09:39 PM2021-01-07T21:39:12+5:302021-01-07T21:41:08+5:30
Mayor Tiwari and Deputy Mayor Dhawade took charge, nagpur news नवनियुक्त महापौर दयाशंकर तिवारी व उपमहापौर मनिषा धावडे यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या परिसरात महापौर व उपमहापौरांचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवनियुक्त महापौर दयाशंकर तिवारी व उपमहापौर मनिषा धावडे यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या परिसरात महापौर व उपमहापौरांचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता.
व्यासपीठावर खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, मावळते महापौर संदीप जोशी, स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे,प्रतोद दिव्या धुरडे, माजी आमदार प्रा.अनिल सोले, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे,डॉ. मिलिंद माने, माजी महापौर माया इवनाते, अर्चना डेहनकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये .तिवारी यांच्या वयोवृध्द मातोश्री शारदा, यांच्यासह कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते.
संदीप जोशी यांनी नवनिर्वाचित महापौर दयाशंकर तिवारी यांचे तुळशीरोप देऊन स्वागत केले व पदभार सोपविला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांच्या शहर विकासाच्या स्वप्नाला गती देण्यार असल्याचे दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. संदीप जोशी म्हणाले, महापौरपद स्वीकारताना आलेल्या अडचणीत, समस्यांमध्ये व प्रत्येक प्रसंगी दयाशंकर तिवारी पूर्ण ताकदीने सोबत राहिले. आज ते महापौर म्हणून नियुक्त झाले. त्यांच्यापुढे अनेक आव्हाने आहेत. शहराला विकासाच्या ट्रॅकवर आणण्यासाठी आम्ही सर्व पूर्ण ताकदीने सोबत आहोत.
दयाशंकर तिवारी यांनी अनेक संघर्ष पेलून इथपर्यंतचा पल्ला गाठला आहे. आव्हाने पेलणे हे त्यांच्या स्वभावातच आहे. त्यामुळे मनपाचे नेतृत्व करताना येणारे प्रत्येक आव्हान ते यशस्वीपणे पार पाडतील असा विश्वास प्रवीण दटके यांनी यावेळी व्यक्त केला. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी महापौर-उपमहापौरांना शुभेच्छा दिल्या. सूत्र संचालन नगरसेवक संजय बंगाले यांनी तर आभार संदीप जाधव यांनी मानले.
मुंढे बोलत होते राधाकृष्णन न बाेलता मारतात
तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोणतीही कामे केली नाही. ते नुसते मीडियाशी बोलत होते. वर्षभरात कोणतीही कामे झालेली नाही. आताचे आयुक्त राधाकृष्णन बी. हेही काही करत नाही. पण न बोलता ते मारतात असा टोला आमदार कष्णा खोपडे यांनी आपल्या भाषणातून लावला. दयाशंकर तिवारी यांचा जनसंपर्क, स्वभाव आणि काम करण्याची शैलीवरून ते शहराच्या सर्वांगीण विकासाची अपेक्षा पूर्ण करतील, असा विश्वास व्यक्त केला.