मनपातर्फे दिव्यांगांना अर्थसहाय्य व ट्रायसिकल वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:07 AM2021-05-28T04:07:41+5:302021-05-28T04:07:41+5:30
नागपूर : महापालिकेतर्फे समाजविकास विभागातर्फे गुरुवारी मनपा मुख्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते ५ दिव्यांगांना ...
नागपूर : महापालिकेतर्फे समाजविकास विभागातर्फे गुरुवारी मनपा मुख्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते ५ दिव्यांगांना स्वयं रोजगारासाठी प्रत्येकी १ लाख ९० हजार रुपयांचे धनादेश तसेच ९ दिव्यांग बांधवांना ट्रायसिकलचे वाटप करण्यात आले.
उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, नगरसेवक दिनेश यादव, उपायुक्त राजेश भगत, समाजविकास अधिकारी दिनकर उमरेडकर, राष्ट्रीय स्वाभिमान परिषदेचे मुन्ना महाजन व भगवानदास राठी आदी उपस्थित होते.
प्रारंभी राजेश भगत यांनी नागपूर महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाद्वारे दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. दिव्यांग बांधवांनी मनपाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. संचालन एमआयएस व्यवस्थापक नूतन मोरे यांनी केले.