मनपा निवडणूक दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीने व्हावी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:09 AM2021-09-27T04:09:52+5:302021-09-27T04:09:52+5:30

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठवणार प्रस्ताव लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यापासून त्याला ...

Municipal elections should be held in two member ward system () | मनपा निवडणूक दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीने व्हावी ()

मनपा निवडणूक दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीने व्हावी ()

Next

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठवणार प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यापासून त्याला बराच विरोध होत आहे. काँग्रेसमध्येही याबाबत एकमत नाही. रविवारी नागपुरात शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत प्रभाग पद्धतीवर सविस्तर चर्चा होऊन मनपा निवडणूक ही दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीने व्हावी, असा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठविण्यात येईल.

शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी शहर कार्यकारिणीची बैठक देवडिया भवनात पार पडली. या बैठकीत आगामी मनपा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. निवडणुकीतील प्रभाग पद्धतीबाबत सर्वांचे मत जाणून घेण्यात आले. यावेळी तीन सदस्य प्रभाग पद्धतीला बहुतांश सदस्यांनी विरोध दर्शविला. याऐवजी दोन सदस्यीय किंवा एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करावी, यातून जनतेची कामे सोडवण्यास मदत होते, असे सांगण्यात आले. महिलांची मतेही जाणून घेण्यात आली. त्यानंतर बहुमताने दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव शहर अध्यक्षांच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्षांना सादर करण्यात येईल. यावेळी बूथ कमिटीचा आढावासुद्धा घेण्यात आला. बूथ कमिट्या तातडीने तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.

बैठकीला डॉ.गजराज हटेवार, बंडोपंत टेंभुर्णे, प्रशांत धवड, प्रा. हरीश खंडाईत, प्रदेश सचिव संजय महाकाळकर,संदेश सिंगलकर,अॅड.नंदा पराते, हैदरअली दोसानी, रेखा बाराहाते, रमेश पुणेकर, प्रशांत ढाकणे,पुरुषोत्तम हजारे,भावना लोणारे,मनोज सांगोळे,हरीश ग्वालबंशी,नितीश ग्वालबंशी,उज्ज्वला बनकर, महेश श्रीवास आदी उपस्थित होते.

- बॉक्स

भारत बंदला समर्थन, काँग्रेस रस्त्यावर उतरणार

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ २७ सप्टेंबर रोजी आयोजित भारत बंदला काँग्रेसने देशव्यापी समर्थन जाहीर केले आहे. त्यानुसार सोमवारी शहरात काँग्रेस पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करेल. सर्व पदाधिकारी, सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आंदोलनात उतरावे, शाळा-महाविद्यालये बंद ठेवावी, असे आवाहन यावेळी आ. विकास ठाकरे यांनी केले.

Web Title: Municipal elections should be held in two member ward system ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.