महापालिकेचा दिव्याखाली अंधार !

By admin | Published: September 8, 2015 05:01 AM2015-09-08T05:01:04+5:302015-09-08T05:01:04+5:30

रात्रीला शहरातील रस्ते प्रकाशमान करणाऱ्या पथदिव्यांच्या एका रहस्याचा भंडाफोड झाला आहे. कळत-नकळत

The municipal light of darkness! | महापालिकेचा दिव्याखाली अंधार !

महापालिकेचा दिव्याखाली अंधार !

Next

कमल शर्मा ल्ल नागपूर
रात्रीला शहरातील रस्ते प्रकाशमान करणाऱ्या पथदिव्यांच्या एका रहस्याचा भंडाफोड झाला आहे. कळत-नकळत महानगरपालिका ‘मोफत’च्या विजेवर हा झगमगाट करीत आहे. यासंबंधी वीज वितरण फे्रंचायजीने मनपा प्रशासनाला पत्र जारी करू न, त्याची माहिती दिली आहे. मात्र याविषयी कंपनीला विचारणा केली असता, ही चोरी नसून अनियमितता असल्याचे सांगितले जात आहे. शहरातील संपूर्ण पथदिवे लावणे व त्याला वीज पुरवठा करण्याची जबाबदारी ही मनपा प्रशासनाची आहे. यासाठी वेगळे खांब लावले जातात, शिवाय मीटरसुद्धा स्वतंत्र असते. त्या मीटरवरील रीडिंगनुसार वीज कंपनी मनपाला बिल आकारते. परंतु शहरातील अनेक भागात यामध्ये अनियमितता होत आहे. अनेक ठिकाणी डायरेक्ट (विनामीटर) विजेचा उपयोग केला जात असल्याचे एसएनडीएलच्या चौकशीतून पुढे आले आहे.
माहिती सूत्रानुसार, रस्त्यांच्या रुदीकरणानंतर अतिरिक्त लावण्यात आलेले पथदिवे थेट फेजसोबत जोडण्यात आले आहेत. यात मानेवाडा, वाठोडा, कामगारनगर, नारा व रामबाग आदी भागात असे चित्र दिसून येते. यासंबंधीच्या घटना पुढे येताच डॅमेज कंट्रोल सुरू झाले आहे. एसएनडीएलने ११ ठिकाणी नवीन मीटर लावले आहेत; शिवाय ७८ खराब मीटर बदलून ७५० खांब मीटरशी जोडले आहेत.

मनपाला पत्र
४वीज वितरण फ्रेंचायजी एसएनडीएलचे बिझनेस हेड जगदीश चेलारमानी यांच्या मते, यासंबंधी कंपनीने मनपाला पत्र जारी करू न त्याची माहिती दिली आहे. पथदिव्यांसाठी उपयोग होत असलेल्या विजेचे बिल तयार व्हावे, अशी कंपनीची इच्छा आहे, कारण यामुळेच वीजहानी वाढत असून, त्याचा सामान्य नागरिकांना फटका सहन करावा लागत आहे. मात्र सध्या सुरू असलेली ही चोरी नसून अनेकदा नागरिकांच्या मागणीनुसार मनपाला अतिरिक्त वीजखांब लावावे लागत असल्याचे चेलारमानी म्हणाले.

नियमांचे उल्लंघन
४एसएनडीएलच्या मानेवाडा झोनमधील ५४० ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले आहे. माहिती सूत्रानुसार, एसएनडीएलतर्फे करण्यात आलेल्या चौकशीतून तीन प्रकारे वीज पुरवठा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे उघड झाले आहे. यात विनामीटर पथदिव्यांना होत असलेला वीज पुरवठा, रस्त्यांवरील अर्धेच पथदिवे मीटरवर असून इतर सर्व डायरेक्ट जोडण्यात आले आहेत, तसेच काही ठिकाणी पथदिव्यांचे मीटरच जळलेले आढळून आले आहेत.

हो, असे होत आहे - मनपा
४मनपाच्या वीज विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल यांनी शहरातील पथदिव्यांबाबत असे होत असल्याचे मान्य केले. त्यांच्या मते, अनेकदा नागरिकांच्या हितासाठी स्ट्रीट लाईट फेजऐवजी दुसऱ्या फेजचा उपयोग केला जातो. परंतु मनपा डायरेक्ट लाईटचे सुद्धा शुल्क भरत असल्याचे ते म्हणाले.
मोफत व चोरीतील तफावत
४जर एखादी सामान्य व्यक्ती डायरेक्ट फेजवरू न वीज पुरवठा घेत असेल, तर ती वीजचोरी म्हटल्या जाते. वीज कंपनी त्यावर धाड घालून त्या व्यक्तीला केवळ दंडच ठोकत नाही, तर गुन्हासुद्धा दाखल केल्या जातो. परंतु या प्रकरणात मनपा व एसएनडीएल काही वेगळाच विचार करीत आहे. एसएनडीएल ही अनियमितता असल्याचे सांगत आहे.

Web Title: The municipal light of darkness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.