मनपा, मेडिकल, विद्यापीठाची ‘घडी’ बिघडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:07 AM2021-01-18T04:07:33+5:302021-01-18T04:07:33+5:30

ऐतिहासिक वारसाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष मंगेश व्यवहारे, विशाल महाकाळकर नागपूर : संत्रा आणि पुतळ्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहराला ...

Municipal, medical, university 'clock' went bad | मनपा, मेडिकल, विद्यापीठाची ‘घडी’ बिघडली

मनपा, मेडिकल, विद्यापीठाची ‘घडी’ बिघडली

googlenewsNext

ऐतिहासिक वारसाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

मंगेश व्यवहारे, विशाल महाकाळकर

नागपूर : संत्रा आणि पुतळ्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहराला ऐतिहासिक घड्याळांच्या वैभवाचे कोंदण लाभले आहे. शहरातील काही महत्वांच्या वास्तूंवर भव्य घड्याळी आजही बघायला मिळतात. पूर्वी या घड्याळींच्या काट्यावर नागपूरकरांचे काम चालायचे. आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यामुळे मान उंच करून वेळ बघण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. त्यामुळेच काही काय या ऐतिहासिक घड्याळी आज बिघडल्या आहेत.

नागपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), रेल्वे स्टेशन, जीपीओ, विद्यापीठाचे परीक्षा भवन, सदर येथील चर्च येथे या ऐतिहासिक घड्याळी बघायला मिळतात. या सर्व इमारती ऐतिहासिक आहेत, त्यामुळे घड्याळांचे महत्वही तेवढेच आहे. ऐतिहासिक घड्याळी असतानाही महापालिका प्रशासनाने यात आणखी एक मानाचा तुरा रोवला. २०११ मध्ये मनपाने अजनी चौकात लाखो रुपये खर्चून घंटाघर बांधले होते. त्या घंटाघराची रचनाही आतिशय सुरेख केली होती.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घड्याळ टॉवर ऑफ होम म्हणून ओळखल्या जात होती. मिळालेल्या माहितीनुसार १९५२ मध्ये ती लावण्यात आली होती. ६० फूट उंचीवर ४ डायल असलेली ही घड्याळ मेडिकलचे वैभवच होती. त्यावेळी मॉडेल मिलच्या भोंग्यावर व मेडिकलच्या घड्याळीच्या काट्यावर अर्ध्या शहराचे कामकाज चालत होते. कालांतराने या घड्याळीत बिघाड होत गेला. अनेक वर्षापासून ती बंद आहे. २००७ मध्ये मेडिकलच्या हीरक महोत्सवानिमित्त हे घड्याळ सुरू करण्यात आले. टायटन कंपनीच्या साहाय्याने जुने घड्याळ काढून त्या ठिकाणी नवीन घड्याळ बसविण्यात आले. पण पुन्हा या घड्याळीचा वेळ बिघडला आणि तो अजूनही बिघडलाच आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेली संस्था लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही अतिशय जुनी संस्था आहे. या परिसराला आता विद्यापीठाचे परीक्षा भवन म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. या संस्थेच्या इमारतीच्या टॉवरवर लागलेले घड्याळसुद्धा बंद आहे. मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अजनी चौकात उभारलेले २१ फूट उंचीच्या घंटाघराची घड्याळ सुद्धा बंद पडली आहे.

- रेल्वे स्टेशन, जीपीओ वेळेत

नागपूरचे मध्यवर्ती रेल्वे स्टेशन ऐतिहासिक आहे. या रेल्वेस्टेशनच्या पश्चिम द्वारावर सुद्धा मोठी घड्याळ इमारत निर्मितीच्या काळात लावण्यात आली. जीपीओच्या ऐतिहासिक इमारतीवरही मोठी घड्याळ लावली आहे. या इमारतीवरील दोन्ही घड्याळी योग्य वेळ दाखवित आहे.

Web Title: Municipal, medical, university 'clock' went bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.